७ विविध तेलांनी नाभी अभ्यंग करण्याचे आश्चर्यकारक फायदे

Astonishing benefits of belly button massage with 7 type of oils

मानवी शरीर रुपी घरास ९ द्वार असतात हा उल्लेख आपणास श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेमध्ये आढळतो. त्या ९ द्वारांची गणना म्हणजे आपले २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, तोंड, गुदद्वार व प्रजनन द्वार अशी केलेली दिसते. मानवी शरीराचे १० वे द्वार म्हणजे आपली नाभी म्हणजेच बेंबी. यात प्रत्येक द्वाराच महत्व वेगळे आहे. तस पाहील तर मानवी शरीराला असंख्य द्वारं आहेत. ती म्हणजे त्वचेवर असलेली असंख्य छिद्रे. या प्रत्येक द्वाराचा उपयोग शरीराच्या सर्वांगीण विकास सुलभतेने होण्यासाठी तसेच विविध कर्म करण्यासाठी केला जातो

आपणा सर्वांस माहीत असेलच की मानवी शिशुचे आईच्या गर्भात नाभी द्वारे पोषण होते. याचाच अर्थ नाभी ही शरीराचा नुसता मध्यच नाही तर नाभी शरीराचे जन्क्शन आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चला जाणून घेऊया नाभी अभ्यंग नेमके कसे करतात

Img source:Google

◉ नाभी अभ्यंग करण्याची प्रभावी पद्धत
नाभी अभ्यंग करायला खूपच सोपा व सकारात्मक परिणाम कारक मसाज आहे. प्रथम अंघोळ करताना नाभी स्वच्छ करावी. स्वच्छता करताना बोटाचे नख लागणार नाही याची काळजी घ्यावी. नाभीत इजा झाली तर ती खूपच वेदनादायी असते. नाभी अभ्यंग दिवसाच्या कोणताही वेळेस केले तरी चालते. परंतु रात्री झोपताना केल्यास अधिक लाभदायी असते. नाभीत ३-४ थेंब तेल सोडावे नंतर नाभीत बोट ठेऊन घड्याळाच्या दिशेने व विरुद्ध दिशेने प्रत्येकी २० वेळा फिरवावे. नंतर बोटाने थोडा दाब द्यावा. नंतर नाभीच्या बाहेर घड्याळाच्या दिशेने पोटास मसाज  करावे. हि सर्व प्रक्रिया अवघी ५-१० मिनिटातच पूर्ण होते. नंतर पुन्हा नाभीत २ थेंब तेल सोडावे. कपड्यांना तेलाचे डाग पडू नये म्हणून त्यावर कापूस किंवा सुती कापडाची घडी ठेवावी व उताणेंच झोपावे.  

वरील प्रमाणे मसाज करताना कोणते तेल वापरल्याने काय लाभ मिळतात ते पाहू.

◉ नारळाच तेल
त्वचा कोरडी पडत असेल, अंगाला खाज / कंड  येत असेल, टाचांना भेगा पडल्या असल्यास नारळ तेलाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते. 

◉ कडुनिंबाचे तेल 
त्वचेवर पांढरे डाग येत असल्यास, चेहऱ्यावर मुरुमं किंवा पुटकुळ्या येत असतील तर, त्वचेवर संसर्ग होत असल्यास कडुनिंबाचे तेल वापरल्यास फायदेशीर ठरते.

◉ राई / मोहरी तेल 
शरीरात उत्साह नसेल, शरीर सुस्त असेल, रात्री ७-८ तास झोपूनही सकाळी उत्साही वाटत नसेल, शरीरात ऊर्जा कमी असेल तर, ओठ फाटले असतील तर राईचे / मोहरीचे तेल वापरल्यास फायदेशीर ठरते.

◉ बदाम तेल
बदाम तेल वापरल्याने पुढील फायदे होतात त्वचा तुकतुकीत दिसते, दृष्टी चांगली होते, मेंदूची क्षमता सुधारते, केस चमकदार दिसतात.

एरंडेल तेल
अंग दुखत असेल किंवा हाडाच्या सांध्यात दुखत असेल तर एरंडेल तेलाचे ३-४ थेंब रात्री झोपताना नाभीत सोडून  व वर सांगितल्या प्रमाणे हलका मसाज केल्यास सकाळी अंगदुखी व सांधेदुखी कमी होते

◉ लिंबाचं तेल 
शरीराच्या आत होणारा संसर्ग, अंगावर चट्टे उठणे, महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असल्यास लिंबाचं तेलवापरल्यास फायदेशीर ठरते.

◉ ऑलिव्ह तेल
आपल्यायकृताचे आरोग्या चांगले राहते, यकृत मजबूत होते त्या मुळे यकृताची कार्यक्षमता वाढते, उच्य रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी ऑलिव्ह तेलाचा चांगला उपयोग होतो. ऑलिव्ह तेल नाभीत सोडू मसाज केल्याने पचनाची समस्या, गॅसची समस्या, बद्धकोष्ट, पित्ताची समस्या अश्या अनेक समस्यां मध्ये फायदेशीर असते. तसेच स्नायूं मध्ये  पेटके  येत असल्यास त्यासाठीही गुणकारी आहे.

अल्कहोल
सर्दी पडसं बरे करण्या साठी कापूस अल्कहोलमध्ये भिजवून नाभीवर ठेवल्यास फायदेशीर ठरते. सर्दी पडसं बरे करण्या साठी कापूस अल्कहोलमध्ये भिजवून नाभीवर ठेवल्यास फायदेशीर ठरते.

वर दिलेले उपाय रोज केल्यास आरोग्य सुधारते. ज्या व्याधीसाठी नाभी अभ्यंग करायचा आहे व जे तेल वापरून मसाज करणार आहोत तो मसाज काही दिवस रोज केल्यास हळूहळू व्याधी बरी होते. कोणतीही व्याधी नसताना वरील पैकी वेगवेगळी तेल रोज वापरली तरी सर्व फायदे मिळण्यास मदत होते. दोन वेगवेगळ्या तेलांचा एकत्रित उपाय पण करून चालतो. गंभीर व्याधी असल्यास या उपायानं बरोबर तज्ञानचा सल्ला घेणे आवश्यक

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.  

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments