५ व्याधींवरील मसाज उपचार

Massage Therapy on 5 Diseases

मानवी जीवनात आरोग्या टिकवण्यासाठी, सुधारण्यासाठी, बिघडलेले आरोग्य चांगले करण्यासाठी किंवा एखादा आजार झाला तर तो आजार बरा करण्यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या व्याधी नुसार वेगवेगळी उपाय योजना केली जाते. जसे तोंडावाटे पोटातील उपचार, शरीरात टोचून केलेले उपचार, किंवा शरीराच्या बाह्य भागावर केलेला उपचार आणखीही काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. विविध उपचार पद्धती मधील एक उपचार पद्धती म्हणजे मसाज. मसाज ही उपचार पद्धती अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरेल यात शंका नाही. मुख्य म्हणजे या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम काहीही नाहीत, सर्वत्र उपलब्ध आहेत शिवाय कमी खर्चिक आहेत. काही साधे मसाज हे तर आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. कोणतीही उपचार पद्धती आपण स्वीकारली तरी त्या बरोबर किमान एक उपउपचार येतोच. जसे पथ्य, डाएट प्लान, मसाज, व्यायाम (फिजिओ थेरेपी) यांची जोड मूळ उपचारा बरोबर द्यावी लागते. जाणून घेऊया कोणकोणत्या व्याधींवर उपचार म्हणून मसाजचा वापर करतात.

लकवा

लकवा हा आजार मेंदूच्या संदर्भातील आहे. मेन्दूच्या ज्या भागात काही कारणाने रक्तपुरवठा खंडित झाला असल्यास त्या भागाशी संबंधित अवयवांवर दुष्परिणाम होतो. लकवा सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. लकवा आला असल्यास हळुवार थोड थोड तेल जिरवून लकवा झालेल्या अवयवाला व त्याच्या संबंधित भागाला मसाज करावा. जोडीला विशिष्ठ व्यायामाची जोड द्यावी लागते. सौम्य लकवा असेल तर सकारात्मक परिणाम लवकर दिसतात. हा मसाज जोडउपचार म्हणून वापरावा. 

मान किंवा पाठ आखडणे / चमक भरणे

मान किंवा पाठ आखडणे हे बहुतेक वेळा चुकीच्या पद्धतीने वाकून काहीतरी उचलताना किंवा चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होणारा त्रास आहे. मान किंवा पाठ आखडली असल्यासआखडलेल्या भागाला व त्याच्या सभोवताली मसाज करावा. मसाज करताना दुखत असलेल्या भागाच्या पूरक स्नायूंना पण मसाज करावा. किमान ४-६ दिवस वजन उचलू नये. जाणीव पूर्वक योग्य पद्धतीने झोपावे.

सायटिका

सायटिका हा आजार प्रामुख्याने सायटिका नस दाबली गेल्यामुळे होतो. पाठीच्या कण्यातील लंबर भागात माणक्या मधील गादी सरकल्यामुळे किंवा दोन मणक्यातील अंतर कमी झाल्यामुळे सायटिका नस दाबली जाते हा आजार कमरेच्या वर पाठी पासून तळपाया पर्यंत एका पायाला किंवा दोन्ही पायाला होऊ शकतो. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर लंबर, पाश्वभाग, मांड्या व पोटऱ्या यांमध्ये क्रमाक्रमाने वेदना वाढत जातात. कमरेच्या वर पाठी पासून तळपाया पर्यंत मसाज केल्यास आराम मिळतो. जोडीला विशिष्ठ व्यायामाची जोड द्यावी लागते

Image Source Google

व्हेरिकोज व्हेन्स

व्हेरिकोज व्हेन्सहा आजार प्रामुख्याने पोटरीच्या भागात होतो. पायातील रक्तवाहिन्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करत असतात. त्यासाठी रक्तवाहिन्यां मधील झडपा हृदया कडे जाणारे रक्त पुन्हा खाली उतरूनये त्यासाठी कार्य करत असतात. त्या झडपा कमकुवत झाल्या तर त्यांची कार्यक्षमता कमी होते त्या मुळे रक्त साकळून ती शीर काळी-निळी व झिगझ्याग वळणांची दिसते. पोटरी मधील याच प्रणाली मुले पोटरीला दुसरं हृदय असे म्हणतात. खोटे पासून मांडी पर्यंतच्या भागाला मसाज केल्यास हळू हळू आराम मिळतो. 

Image Source Google

डोकेदुखी, पायदुखी व अंगदुखी

अती कष्ट, दगदग, ताणतणाव, अती विचार करणे अश्या विविध कारणानमुळे डोकेदुखी, पायदुखी व अंगदुखीच्या समस्या उद्भवतात. कारण जरी कोणतेही असले तरी त्यावर मसाज हा उत्तम उपचार म्हणून आपण वापरू शकतो. मासाज करताना विशिष्ठ दाब देऊन शरीरातील मासपेशींना आराम देता येतो. शरीरातील वेदना कमी तर होतेच शिवाय आराम मिळाल्या मुळे तरतरी पण येते.

वरील सर्व उपचार तज्ञानच्या सल्यानी करावे

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.  

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments