Su jok Therapy

आपल्याला होणाऱ्या विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी आयुर्वेदिक उत्पादने पुढील वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
https://www.prakrutijiyofresh.com/?aff=63
सर्वसामान्यांना पटकन समजेल अशी साधी, सरळ व सोपी “सु जोक” उपचार पद्धती आहे. ही उपचार पद्धती साऊथ कोरियाचे प्रोफेसर पार्क जे वू (Pro. Park Jae Woo) यांनी शोधून विकसित केली आहे. सु जोक थेरेपी मध्ये अनेक थेरेपीचा अंतर्भाव आहे. या मध्ये प्रामुख्याने ऍक्यूप्रेशर, ऍक्यूपंचर, मसाज थेरेपी, मॅग्नेट थेरेपी, कलर थेरेपी, सीड्स थेरेपी अश्या व आणखीन बर्याच उपचार पद्धतीचा वापर सु जोक थेरेपी मध्ये केला जातो.
सु जोक म्हणजे नेमके काय ?
कोरियन भाषेतील सु जोक शब्दाचा मराठी अर्थ सु म्हणजे हात व जोक म्हणजे पाय असा आहे. प्रो. पार्क यांना आपले शरीर व आपले हात पाय यात साम्य आढळून आले. ते साम्य म्हणजे आपल्या शरीराच्या मुख्य भागा मधून पाच भाग बाहेर आले आहेत. ते पाच भाग म्हणजेच आपले दोन हात, दोन पाय व चेहेरा त्या प्रमाणेच आपल्या हाताचा तळवा व पायाचा तळवा हे जर मुख्य भाग मानले तर त्यातूनही पाच भाग बाहेर आले आहेत. ते पाच भाग म्हणजे आपल्या हाता पायाची बोट. त्यातील अंगठा म्हणजे आपला चेहेरा, पहिलं बोट व करंगळी म्हणजे आपले दोन्ही हात मधल बोट व अंगठी घालायचे बोट (रिंग फिंगर) म्हणजे आपले दोन्ही पाय. याच प्रमाणे शरीरातील बाकी सर्व अवयव मुख्य भागावर मांडले तर हाताचा तळवा व पायाचा तळवा म्हणजे आपले संपूर्ण प्रति शरीर तयार होते. याचे कारण असे आहे की मूळ शरीर रचना व हाता पायाची रचना यात सारखेपणा आहे. शिवाय हात पाय व प्रत्यक्ष अवयव हे मेरिडियननी, विविध नसांनी व शिरांनी एकमेकांना जोडलेले असतात.
आश्चर्यकारक समानता
हात पाय व प्रत्यक्ष शरीर यातील साम्याचे अजून एक प्रात्यिक्षित पाहू. हाताची किंवा पायाची बोट नीट निरखून पाहिल्यास असे लक्षात येते की जसे हाताला मुख्य मनगटाचा, कोपराचा व खांद्याचा असे तीन सांधे आहेत तसेच बोटांनाही तीन सांधे आहेत. तसेच पायाच्या बोटांनाही तीन सांधे आहेत जसे घोट्याचा, गुढघ्याचा व खुब्याचा असे तीन सांधे आहेत. पण अंगठ्याला दोनच सांधे आहेत. जसे धडाला असलेला मानेचा सांधा व चेहऱ्याला असलेला मानेचा सांधा. एव्हडी समानता पाहिल्यावर या उपचार पद्धती बद्दल आपली नक्कीच खात्री निर्माण होईल.
आता आपण टी व्ही व त्याचा रिमोट ह्या उदाहरणाने वरील संकल्पना समजून घेऊ. जसे रिमोट वरील बटण दाबून आपण टी व्ही वर अपेक्षित परिणाम अनुभवतो त्याच प्रमाणे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात / अवयवात काही त्रास / व्याधी उद्भवली असल्यास त्यावर उपचार आपल्या दोन्ही हाताच्या व दोन्ही पायाच्या पंज्या वर करून ती व्याधी आपण दूर करू शकतो.
खालील चित्रा वरून ही संकल्पना समजू शकेल.

यात यिन व यांग अश्या बाजुंचा विचार आवश्यक आहे. यिन म्हणजे पुढील बाजू व यांग म्हणजे पाठीमागची बाजू.या नुसार बघितलं तर पोटदुखी साठी उपचार करायचे असतील तर यिन बाजूवर उपचार करणे आवश्यक आहे. म्हणजेच तळहात किंवा तळपायावर उपचार केले जातात. तसेच पाठदुखीसाठी यांग साईडला म्हणजेच तळ हाताच्या किंवा तळ पायाच्या मागच्या बाजूस उपचार केले जातात

वर मांडलेली संकल्पना म्हणजे सु जोक उपचार पद्धतीचा पाया आहे. हि मूलभूत उपचार पद्धती सर्वसामान्यांना सहजपणे घरच्या घरी ऍक्यूप्रेशर तंत्राचा वापर करून करता येते. यातच वेगवेगळ्या प्रगत उपचार पद्धती पण उपलब्द आहेत. त्यासाठी मात्र तज्ञान कडून मार्गदर्शन घेतल्यास फायदेशीर होईल.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
Changali mahiti👍😊