Balance your Vata, Pitta, Kapha & Heat with Home Remedies
साहित्य : मेथी दाणा (मेथीचं बी), ओवा, जिरे व बडीशेप.
गुणधर्म : ह्या घरगुती उपायात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.
मेथी दाणा (मेथीचं बी) हे रक्तातील शर्करा नियंत्रित करते. त्या मुळे रक्त दाब नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी संतुलित करते. स्नायूंना बळकटी देते. चयापचनाची क्रिया सुधारते. पोटाचे विकार दूर करते. यकृत व मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उत्तम. मासिक पाळी दरम्यान पोटात येणारे पेटके किंवा पोटातील वेदना निवारण्यासाठी उत्तम. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी दुग्धवर्धक आहे. हे शरीर बळकट करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी उत्तम औषधी आहे. मेथी हा उष्ण पदार्थ आहे मेथी कफ नियंत्रित करतो. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. मेथी मुळे रोग प्रतिकार शक्ती सुधारते.
ओवा हा अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल व दाह शामक आहे. ओवा वात नाशक आहे. पोटातील गॅस व पोटाच्या इतर गॅस संबंधित तक्रारी निवारण्यासाठी उत्तम. छाती मधील पित्ताची जळजळ कमी होते.
जिरे हे अँटीऑक्सिडंट व भरपूर लोह युक्त आहे. रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यासाठी उत्तम आहे. चयापचय साठी उत्तम. ह्यात खनिजे व फायबर भरपूर प्रमाणात असतात.
बडीशेप सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. बडीशेप मध्ये पोट्याशिअम, मॅग्नेशिम, फॉस्फरस व इतर पोषक तत्व असतात. बडीशेप मुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कृती : रात्री झोपायच्या आधी एक ग्लास पाणी घ्यावे त्यात मिसळणाच्या डब्यातील / फोडणी करायच्या डब्यातील छोटा चमचा भरून वरील सर्व घटक एक एक चमचा ग्लासात घ्यावे व सर्व घटक रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी उठल्यावर दात न घासता उपाशीपोटी ते पाणी प्यावे व भिजलेले सारे जिन्नस चावून चावून खावे वर पुन्हा थोडे पाणी प्यावे.
वरील उपाय सलग दोन आठवडे करावा ह्या उपायाने वात, पित्त, कफ, उष्णता नियंत्रित राहतेच शिवाय वजन कमी करण्यासाठी स्नायू मजबूत करण्यासाठी त्याचा फायदा होतो. सांधेदुखी सारखे आजार दूर होतात. ज्यांना हा उपाय करून बराचसा फरक पडला असेल व पूर्ण बर वाटल नसेल त्यांनी एक आठवडा सोडून पून्हा दोन आठवडे हा प्रयोग करावा.
वरील उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतो. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.