Lifestyle Diseases

आजच्या या धावपळीच्या आधुनिक जमान्यात घरा घरांमध्ये विविध आजारांनी अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. कोणाला डायबेटीस, बी पी सारखे आजार आहेत, तर काहीजणांना लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर अश्या अवयवांचे आजार आहेत तर कोणाला थायरॉईड, ब्रेनस्ट्रोक तसेच कँसर सारखे आजार आहेत अगदीच काही नाही तर डिप्रेशन तर अनेकांना असतंच. मग हे आजार नेमके कश्यामुळे उद्भवतात? ह्याच जर उत्तर शोधलं तर मेडिकल सायन्सनी या सर्व आजारांना एक कॉमन नाव दिले आहे ते म्हणजे लाईफ स्टाईल डिसीज. लाईफ स्टाईल डिसीझ चा सरळ अर्थ असा आहे कि ज्या पद्धतीची दिनचर्या सुरु होती त्या पद्धतीच्या दिनचर्येमुळे त्या व्यक्तीला तो आजार जडला आहे.
या आजारांवर उपाय म्हणून आपण त्या त्या आजाराच्या तज्ञान कडून औषधोपचार घेत असतो. बहुतेक आजारात हि औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. म्हणजे लाईफ स्टाईल डिसीज वरील औषधोपचार लाईफ टाइमसाठी घ्यावा लागतो. शिवाय त्या औषधांच्या बरोबरीने नाईलाजास्तव पथ्य सांभाळाव लागतं. मग या आजारांवर उपाय काय?

FREE…..Learn YouTube Masterclass, Social Media Marketing & Optimization, Trading Masterclass and much more. For More info Click below link.
या आजारांवर उपाय म्हणजे आपली दिनचर्या बदलणे. म्हणजेच आपली लाइफस्टाइल बदलणे. आजारी पडल्या नंतर नाईलाजास्तव पथ्य पाळावी लागतात त्या ऐवजी आजारी पडू नये म्हणून पथ्य पाळली तर आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. आपले स्वतःचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सुयोग्य दिनचर्या असणे फार गरजेचे आहे. हि दिनचर्या व त्यातील प्रमाण व्यक्ती नुसार जरी वेगवेगळं असल तरी त्यातील मुद्दे समान आहेत. तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आत्ता वेळ दिला नाहीत तर भविष्यात आजारपणासाठी वेळ व पैसे दोन्ही मोजावे लागतील. शिवाय मनस्ताप होईल तो वेगळाच.

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी महत्वाचे घटक म्हणजे हवा, पाणी, अन्न, झोप, शरीराची अंतर बाह्य स्वच्छता, व्यायाम, सूर्यप्रकाश, मेडिटेशन. परंतु हे घटक नुसते जाणून काहीही निष्पन्न होणार नाही. हे सर्व घटक प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार कृतीत आणणे जास्त फायदेशीर होईल.
तुमच्याकडे ज्या कंपनीचा व ज्या व्हर्जनचा मोबाईल आहे त्या मोबाईल साठी त्याच कंपनीचा ठरवून दिलेला चार्जर आपण वापरतो. दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्यास मोबाईल खराब होण्याची शक्यता जास्त असते. अगदी तसेच आपले शरीर पंच तत्वांनी बनले आहे. त्याच पंच तत्वांचा आपल्या शरीरात संतुलित सहभाग व सहवास आपल्या निरोगी जीवनासाठी फायदेशीर ठरेल. म्हणूनच निसर्गोपचारचा अवलंब करा. ह्या निसर्गानी आपले शरीर म्हणजे सुपर स्पेश्यालीटी हॉस्पिटल पेक्षा आधुनिक व सुसज्ज बनवले आहे. त्या शरीरात निसर्गानीच तज्ञ डॉक्टर्स तैनात ठेवले आहेत. आपल्याला फक्त त्या डॉक्टरांना काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे. त्यासाठी सुयोग्य हवा, पाणी, अन्न पुरवणे, शरीरास पुरेसा व्यायाम देणे, गाढ झोप, मेडिटेश, सूर्यप्रकाश, शरीर अंतर-बाह्य स्वच्छ ठेवणे आपले पहिले कर्तव्य आहे. ज्या पंच तत्वां मुळे आपले शरीर बनले आहे त्या पंच तत्वांचा नियमित सुयोग्य वापर केला तर आपले आरोग्य चांगले राहिल. म्हणूनच आमची स्लोगन लक्षात ठेवा निरोगी आयुष्याचा आधार निसर्गोपचार.
वरील उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतो. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर सांगितलेल्या उपायाचा त्रास होत असल्यास त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.