Boost your Immunity with easy Home Remedies
जसे आपण आपला मोबाईल, डेक्सटॉप, लॅपटॉप सुरक्षित रहावेत कोणत्याही प्रकारचे इन्फेकशन होऊ नये किंवा व्ह्यायरस येऊ नये किंवा महत्वाचे अँप्लिकेशन करप्ट होऊ नयेत किंवा हँग होऊ नयेत म्हणून खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण अँटी व्हायरस लोड करून ठेवतो. हा अँटी व्हायरस नुसता लोड करत नाही तर ठराविक काळानी अपडेट करतो. शिवाय मोबाईलचे सिग्नल चांगले मिळावे म्हणून बुस्टर व डेक्सटॉप, लॅपटॉप ला इंटरनेटचा स्पीड चांगला मिळावा म्हणून जास्तीचा (Mbps) स्पीड आपण घेत असतो. शिवाय वरील सर्व उपकरणातील नको त्या गोष्टी आपण वरचेवर डिलीट करत असतो. जेणेकरून त्यातील कचरा साफ झाल्यावर त्यातील स्पेस मोकळी होते. त्यामुळे आपले सारे अँप्लिकेशन चांगले रन होतात. अगदी अशीच काळजी आपण आपल्या शरीरासाठी घेतली तर आयुष्याचा दूरवरचा पल्ला निरोगी, सुधृड व आरोग्यवान राहून जगता येईल यात शंका नाही.
एक महत्वाची गोष्ट अशी की वरील सर्व वस्तू आपण आपल्या आयुष्यात अनेकदा बदलू शकतो पण आपले शरीर आपल्या आयुष्यात एकदाही बदलता येत नाही. आपल्या शरीराला गृहीत धरून व बेजबाबदारपणे दिनचर्या आचरणात आणून आपण आपल्याच शरीरावर दूरगामी दुष्परिणाम करण्यासाठी कारणीभूत असतो. हे आपल्याला माहीत असूनही अनेकदा स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले जाते व कळत नकळत आपण विविध व्याधींना बळी पडत असतो.
चलातर आपल्या शरीरातील अँटी व्हायरसला अपडेट करूया. म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवूया.
साहित्य : पाणी, लिंबू
गुणधर्म : ह्या घरगुती उपायात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.
पाण्यामध्ये कॅल्शिम, सोडिअम, पोट्याशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.
लिंबा मध्ये व्हिट्यामिन सी भरपूर असते. म्हणजेच सायट्रिक ऍसिड असते. लिंबा मध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटीऑक्सीडंट गुणधर्म असून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप चांगले आहे.
कृती : सर्व प्रथम एक ग्लास पाणी उकळवून ग्लासात ओतून घ्यावे. त्यात अर्धे लिंबू पिळावे व हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी प्यावे.
हे पेयं चहा-कॉफी पितो तसे गरम गरम एक एक घोट घेऊन प्यावे. हे पेय घेतल्या नंतर किमान ४५ मिनिटे ए सी मध्ये किंवा चालू पंख्या खाली बसू नये. उपाशी पोटी घेतल्यास अधिक फायदेशीर असते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. पोटावर वाढलेली चरबी कमी होते. अंगात उत्साह येतो. वजन कमी करण्यास मदत होते. यात चवी नुसार साखर व मीठ घातले तरी चालते. पण असे तयार झालेले सरबत संध्याकाळी घ्यावे.
कोविड १९ सारख्या अनेक घातक विषाणूंना व जीवाणूंना आपल्या पासून दूर ठेवण्यासाठी किंवा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी हा उपाय उत्तम आहे. ज्यांना कोविड १९ ची लक्षण जाणवत असतील त्यांनी हाच प्रयोग दिवसभर करावा म्हणजेच गरमा गरम लिंबू पाण्या व्यतिरिक्त काहीही खाऊ पिऊ नये. या काळात भरपूर विश्रांती घ्यावी. व हे पेय प्यायल्या नंतर पांघरून घेऊन पडावे. नंतर आलेला घाम पुसून घ्यावा.
वरील उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतो. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
