Boost your Immunity with Magnet Therapy
लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वानाच ऋतुमाना नुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे. आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या खूप रोग प्रतिकार शक्ती असते. पण ती टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी रोजची दिनचर्या फार महत्वाची आहे. आपण चौरस आहार(खरंतर षड्रस आहार) घेतो का? काय खातो, कधी खातो, किती खातो, व्यायाम करतो का? तसेच रोज पुरेसं पाणी पितो की नाही व आपली झोप योग्य वेळी व पुरेशी होते कि नाही शिवाय कोणत्याही प्रकारचे धूम्रपान आहे का? अश्या अनेक गोष्टींवर आपली रोग प्रतिकार शक्ती अवलंबून असते
खरंतर षड्रस आहार म्हणजेच कडू, आंबट, तुरट, खारट, तिखट व गोड आपल्या रोजच्या आहारात असतील तर अनेक व्याधींन पासून आपले सौरक्षण होईल.
सुजोक उपचार पद्धतीत अनेक उपचार पद्धती सामाविस्ट आहेत व त्या सर्व पद्धती फक्त हाता-पायाच्या पंज्यावर सहजपणे करून विविध त्रासावर मात करणे सहज शक्य होते. रोग प्रतिकार शक्ती सुजोक उपचार पद्धती मधून कशी वाढवावी ते आपण जाणून घेऊया
सुजोक मधील मॅग्नेट थेरेपी माध्यमातून हाताच्या व पायाच्या पंज्या चा शरीरातील प्रत्यक्ष अवयवाशी मेरिडियनच्या माध्यमातून जे पॉईंट जोडले गेले आहेत त्या बिंदूंवर मॅग्नेट थेरेपी दिल्यास त्याचे सकारात्मक परिणाम आपणास दिसून येतात. वरील उपचार करताना आपणास छोटे बियॉल मॅग्नेट व पेपर टेप चा वापर करणार आहोत.
योग व सुजोक थेरेपीचा गाभा म्हणजे ७ चक्र, मेरिडियंस व संपर्क/ सदृश्य बिंदू. याच बिंदूंवर मॅग्नेट थेरेपीचा वापर आपण करणार आहोत. सुजोक थेरेपी नुसार आपल्या हाताचा व पायाचा पंज्या म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचे प्रतीक आहे. हे आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे आपल्या तर्जनीवर म्हणजेच पहिल्या बोटाच्या पहिल्या पेराच्या टोकाला आंगठ्याच्या दिशेने यिन साईडवर हा पॉईंट आहे या पॉईंटच नांव आहे एल यू ९ हा पॉईंट आपल्या दोन्ही तळहातावर आहे. तसेच आपल्या मधल्या बोटाच्या पहिल्या पेराच्या टोकाला यिन बाजूवर करंगळीच्या दिशेने अजून एक पॉईंट आहे. या पॉईंट च नाव आहे के ३ हा पॉईंट ही आपल्या दोन्ही तळहातावर आहे. या पॉइंटवर बियॉल मॅग्नेटने टोनीफिकेशन करायचे आहे त्यासाठी बियॉल मॅग्नेटची पिवळी बाजू त्वचेला लागेल व पांढरी बाजू पेपर टेप ला लागेल अश्या पद्धतीने त्या पॉइंटवर मॅग्नेट; पेपर टेप ने चिकटवावे.
वरील बिंदू डाव्या व उजव्या दोनी हातावर आहेत. हे सर्व रात्री झोपताना करणे जास्त सोईचे आहे
साधारण ७ ते ८ तास रोज व किमान ३ महिन्या पर्यंत हा उपाय केल्यास रोगप्रतिकार शक्ती हळूहळू वाढते. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे त्यांनी रोज करावे.
वरील उपचार केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.