5 Important things you must know before starting Yoga
आजच्या आधुनिक युगात अनेक जणांना आपले शरीराचे आरोग्या चांगले ठेवण्या बद्दलची जाण चांगली झाली आहे. त्यामुळे शरीर सुडोल ठेवण्यासाठी व्यायाम शाळा (जिम), झुंबा, एरोबिक्स वगैरे व्यायाम प्रकार; तर कोणी चालणे, पळणे, सायकल चालवणे व पोहणे असे व्यायाम प्रकार करत असतात. तर काही जण योगासने करतात. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी योग्य आहाराची माहिती (डाएट प्लॅन) समजून घेऊन त्या प्रमाणे वागत आहेत. थोडक्यात अनेक लोक शारीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जागरूक झाले आहेत.
काही संस्था योगाचा प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देत आहेत. नवीन पिढी पैकी अनेक जण योग वर्ग चालवत आहेत. अश्या या आधुनिक काळात योगा बद्दल माहिती जाणून घेतल्या नंतर अनेकांना योगाचे महत्व पटत आहे. शरीर नीरोगी राहण्यासाठी व दूरगामी सकारात्मक परिणाम साधण्यासाठी योगा मध्ये सांगितलेल्या अष्टांगातील तिसरे अंग म्हणजे “आसन” यावरच सर्व लक्ष केंद्रित करतात. योगाभ्यासात काही बंधन आहेत जी योगासनाला सुरुवात करायच्या आधी योगासन करताना व योगासन झाल्या नंतर पाळावयाची असतात. ती बंधने पाळून केलेल्या योगाभ्यासाचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात.
योगासनं सुरु करायच्या आधी पाळावयाची काही बंधने
🅞 योगासने करण्यासाठीची वयोमर्यादा
योगासनांचा अभ्यास करण्यासाठीच्या वयोमर्यादे संबांधित एक श्लोक हठप्रदीपिका या ग्रंथात आढळतो.
युवा वृध्दोSतिवृध्दो वा व्याधितो दुर्बलोSपि वा।
अभ्यासात्सिध्यिमाप्तेनोति सर्वयोगेष्वतन्द्रितः।। ह.प्र. १ -६४ ।।
याचा अर्थ असा आहे की तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधिग्रस्त किंवा दुर्बल अश्या कोणत्याही व्यक्तिने आळस न करता योगाभ्यास केल्यास त्यास योग साध्य होतो. या अर्था वरुन असे लक्षात येते की बाल्यावस्थेत योग साधना करू नये. कारण वरील श्लोकात बाल्यावस्था वगळली आहे. बाल्यावस्थेत शरीराची वाढ होण्याची प्रक्रिया चालू असते. बाल्यावस्थेत शारिरीक अंतरबदल होत असताना योगाभ्यास करताना प्रामुख्याने हाडे, मास पेशी व स्नायूंवर येणारे ताण बाल्यावस्थेत सहन होणार नाहीत त्या मुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. वर श्लोकात उल्लेख केलेल्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या प्रकुती नुसार झेपतील तेच व झेपतील तेव्हडीच योगासने करावीत.
🅞 योगासन करण्याची वेळ
योगाभ्यासाची उत्तम वेळ म्हणजे पोट रिकाम असेल व शरीर उत्साही असेल अश्या कोणत्याही वेळी योगाभ्यास करणे योग्य असते. योगाभ्यास करताना आज तीस मिनिटं उद्या तास-दीडतास अश्या पद्धतीने योगाभ्यास करू नये. शिवाय आज सकाळी उद्या सायंकाळी अश्याही पद्धतीने योगाभ्यास करू नये. योगाभ्यास करताना दिवसभरातील ठरवलेली वेळ व किती वेळ योगाभ्यास करायचा हे निश्चित ठरवून योगाभ्यास करावा. साधारणपणे रोज एक ते दीड तास योगासनांची साधना पुरेशी आहे. योगासने करण्याचे शारिरीक संपूर्ण फायदे हवे असल्यास योगाभ्यास करताना सातत्य हवं शिवाय वेळेचे बंधन हि आवश्यक आहे.

🅞 योगासन करण्याची जागा
योगाभ्यासाच्या जागे संदर्भात ग्रंथां मधील उल्लेखा प्रमाणे लोकवस्ती पासून दूर रानात किंवा डोंगरावर योगाभ्यास करावा. पण सद्य काळा नुसार आपल्या सोइ नुसार जागा निवडावी. एरवी कोणताही अभ्यास करताना आपण अशी जागा निवडतो जेथे कोणत्याही प्रकारे अभ्यासात व्यत्यय येणार नाही त्याच प्रमाणे योगाभ्यासासाठी सुयोग्य जागा निवडावी. सर्वसाधारणपणे योगाभ्यास करताना मंद पण पुरेसा उजेड असलेली, संथपणे हवा खेळती असलेली, आवाजाचे प्रदूषण नसलेली, माणसांची ये जा नसेल अश्या ठिकाणी शिवाय योगासने विना अडथळा करण्या इतकी मोठी जागा अवश्य आसते. एकदा जागा निश्चित केल्यावर रोज त्याच जागेवर योगासने करावीत. जागा बदलू नये.

🅞 योगासन करण्यासाठी आसन
सर्वात पहिला नियम म्हणजे योगाभ्यास जमिनीवर किंवा फरशीवर बसून करू नये. ग्रंथान मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योगाभ्यास करताना जमिनीवर मृगजीन अंथरून त्यावर योगाभ्यास करावा. परंतु आधुनिक काळात मृगजीन बाळगणे गुन्हा आहे. अश्यावेळी सतरंजी किंवा घोंगडी अंथरून त्यावर योगाभ्यास करावा. या आधुनिक काळात योगाभ्यासासाठी रबर किंवा फोम सारख्या विशिष्ठ पदार्थाचे योगा मॅट बाजारात उपलब्द आहेत. त्याचा वापर केला तरी चालेल.

🅞 योगासन करतानाचा पोषाख
योगाभ्यासासाठीचा पेहराव हा थोडा सैलसर व हालचाली करण्यासाठी सोयीचा असणे आवश्यक आहे. आधुनिक काळात स्त्री – पुरुष दोघांसाठी ट्रॅक पॅन्ट व टी शर्ट उत्तम.

वरील सर्व गोष्टी पाळून योगासनांचा अभ्यास करताना मनाची एकाग्रता असायला हवी, नियंत्रित श्वास व हाता पायाची हालचाल करताना योग्य ठीकाणी श्वास घेणे व सोडणे या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास योगाभ्यासाचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.