Benefits Of Indian Scientific Yoga
https://www.prakrutijiyofresh.com/?aff=63
योग विषय प्रवेश
अनेकांचा असा गैरसमज आहे की योग म्हणजे राना-वनात किंवा एखाद्या डोंगराच्या गुहेत बसून करावयाचा प्रकार आहे. तर काही जणांचा असा समज आहे की योग म्हणजे शरीराला ताणणे, वाकवणे किंवा पिळण्याचा व्यायाम प्रकार आहे. पण तसं नाहीये; खरंतर मानवी जीवनात योगशास्त्राची खूप मोठी भूमिका आहे. योगाने मानवी जीवनात शारिरीक, मानसिक, बौद्धिक व भावनिक प्रगती होते.
ह्या आधुनिक युगात योग सर्वदूर पसरलाआहे. म्हणजेच विविध देशांमध्ये समाजातील विविध वयोगटातील व्यक्ती योगशास्त्र समजून घेत आहेत. शिकत आहेत व प्रत्यक्ष करत आहेत. आज मितीस २१ जुन हा दिवस इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा केला जातो.

पौराणिक संदर्भ
हजारो वर्षा पूर्वी पासून अस्तित्वात असलेला योग याचे संदर्भ अनेक जुन्या ग्रंथात सापडतात. त्यात प्रामुख्याने ऋग्वेद, अथर्व वेद, नारदीय सूक्त, छांदोग्य उपनिषद, बृहद अरण्यक उपनिषध अश्या विविध ग्रंथात श्वासोश्वास, आसन, प्राणायाम यांच्या बद्दलचे उल्लेख आहेत. योग हा शब्द “युज” या संस्कृत धातू पासून बनला आहे. संस्कृत भाषे प्रमाणे युज म्हणजे जोडणे. योग हा नुसता व्यायाम किंवा आसन घालण्याचा प्रकार नाही. खरंतर आत्मशक्तीला परमात्मा शक्तीत विलीन करण्यासाठी योग आहे. शरीरातील आत्मशक्तीला विश्वशक्तीत विलीन करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. आत्मशक्तीला परमात्मा शक्तीत विलीन करणे हे योगा चे अंतिम साध्य आहे.
अष्टांगाच्या आठ पायऱ्या
श्री पतंजली महामुनी यांनी त्यांच्या योगसूत्रे या ग्रंथात सूत्र रूपाने योगशास्त्राच्या आठ अंगांचे वर्णन केले आहे. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ती आठ अंग आहेत. या अष्टांगा मध्ये काही पोट अंग महामुनींनी सांगितली आहेत.
🅞 यम यापहिल्या पायरीमध्येअहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह अशी पाच बंधन समाजात वावरताना पाळायची आहेत.
🅞 नियम या दुसऱ्या पायरीमध्ये शौच, संतोष, ताप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिध्यान अशी पाच बंधने स्वतःसाठी स्वतःवर कटाक्षानी पाळायची आहेत.
🅞 आसन यात वरील दोन यम व नियम या पायऱ्या पार झाल्यावर शरीर व मनाची स्थिरता निर्माण करण्यासाठी या तिसऱ्या पायरीचे प्रयोजन केले आहे.
🅞 प्राणायाम यात चित्ताची एकाग्रता व्हावी व ती टिकून ठेवण्यासाठी चवथ्या पायरीची योजना केली आहे.
🅞 प्रत्याहार यात आत्मा व परमात्म्याची भेट घडवण्यासाठी समाधी अवस्थेचा अनुभव घ्यायचा असेल व भौतिक जीवनातून परावृत व्हायचे असेल तर हि पाचवी पायरी फार महत्वाची आहे.
🅞 धारणा यातभौतिक जीवनातून परावृत झाल्यावर समाधीकडे जाण्यासाठी ही पूरक सहावी पायरी आहे.
🅞 ध्यान यातभौतिक जीवनातून परावृत झाल्यावर समाधीकडे जाण्यासाठी ही सातवी पायरी आहे.
🅞 समाधी ही आठवी पायरी आहे. समाधी फळास आल्यास सुप्तावस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. त्यावेळेस काही सिद्धी प्राप्त होतात.

जेव्हा आपण योगशास्त्र जाणून घेण्याचा किंवा शिकण्याचा विचार करतो तेव्हा शरीरा बरोबर मनाचा सहभाग हि अपेक्षित आहे. कारण आपल्या विचारांचे परिणाम मनावर व मनाचे परीणाम शरीरावर होत असतात. म्हणूनच योग शास्त्राचे आद्य प्रणेते श्री पतंजली महामुनी यांनी योग शास्त्राची व्याख्या सांगताना योगश्चित्तवृत्तिनिरोधः असे म्हंटले आहे. म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. निरोगी शरीर व नियंत्रित मन एकत्रित आले कि जीवनमार्ग सुखाचा होतो. म्हणूनच सुखी व समृद्ध जीवनाचा योग हा राजमार्ग आहे. ही योग साधना करता करता मानवी जीवनाची शारिरीक, मानसिक, बौद्धिक व भावनिक प्रगती होते.
योगाचे प्रकार
भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, हठयोग, ध्यानयोग, प्रेमयोग
आत्मा व परमात्म्याचा संगम होण्यासाठी योग फार महत्वाचा आहे. हा संगम साधण्यासाठी भक्तीयोग, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, हठयोग, ध्यानयोग व प्रेमयोग हे मार्ग आहेत.
योग करताना शरीर व मन निरोगी होत असेल तर योग हि उपचार पद्धती म्हणून वापरू शकतो का? हा प्रश्न पडणं सहाजिक आहे परंतु कोणतेही आजार होऊ नये म्हणून योगाचे प्रयोजन आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.