मन करा रे मोकळं

Unburden your mind

समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून आपल्या मनाला तू काय काय करावेस व काय काय करू नयेस याची यादीच दिली आहे. मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाशी हितगुज करत आपल्या शरीराची व मनाची सांगड घालून दैनंदिन जीवन सुयोग्य, सुनिश्चित, सुरक्षित, सकारात्मक, आनंदी व मनाला नियंत्रित करण्यासाठीचा जणू कान मंत्रच. रामदास स्वामींनी मनाचे श्लोकांच्या माध्यमातून आपले मन किती महत्वाचे आहे हे दर्शवले आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या विचारांचे परिणाम मनावर व मनाचे परिणाम शरीरावर होत असतात. म्हणूनच आपण मनाच्या आहारी न जाता मनाला आपल्या ताब्यात ठेवल्यास आपल्या शरीरासाठी व एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर असते. 

 

Image Source : Google

आजच्या आधुनिक काळात सद्यस्थितीत बाहेर डोकावून पाहिल्यास असे जाणवते की अनेक व्यक्ती मनावर प्रचंड ओझं घेऊन जगत आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्या बरोबर शारिरीक, कौटुंबिक, सामाजिक आरोग्याचे नुकसान होत आहे. याची अनेक कारणे आहेत. कळत नकळत जोपासलेला इगो, ईर्षा, स्पर्धा, अवास्तव अपेक्षा ह्याच्या बरोबरीने कोविड-१९ ची धास्ती, संभ्रम व त्या मुळे उद्भवलेल्या विविध समस्यांनी आपण त्रस्त होत आहोत.  

सध्या कोविड-१९ मुळे अनेकांचे संपूर्ण जीवन अडचणीत अडकल्या सारखी अवस्था झाली आहे तर अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. बऱ्याच जणांची नोकरी गेली आहे तर अनेकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. त्या मुळे आर्थिक विवंचना वाढल्या आहेत. कोणाच्या घरात कोविड-१९ पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च करावा लागत आहे. एव्हढ करूनही आपलं माणूस सुखरूप बरा होऊन घरी येईल की नाही या विचारांनी मनाची घालमेल होत आहे. रोजचीच कोरोना बाधितांची वाढती संख्या, राजकीय व आर्थिक तंग वातावरण व वैद्यकीय ठोस उपाय योजना (लस) उपलब्द नसणे, अश्या अनेक कारणांनी त्रस्त झाल्यामुळे तुमच्या मनात राग, द्वेष, चिंता, काळजी, नैराश्य, दुःख व हताश अवस्था झाल्यामुळे मनावर दडपण आलं आहे का?  मनावरील ओझं कमी करायचं आहे का? कोणाशी बोलू असा प्रश्न पडला आहे का? कसं व्यक्त होऊ संकोच वाटतो आहे का? असे अनेक प्रश्न मनात घोळत असतील तर बिंधास्त माझ्याशी बोलून मनावरील ताण कमी करा. हा आरोग्य सखा आपल्या मदतीसाठी तत्पर आहे. तुम्ही व्यक्त झालात तर तुमचे मन हलके होईलच; त्यातूनच समस्या सोडवण्याच्या नवीन वाटा सापडतील. मनावरील ओझं कमी झालं की तुम्हालाही हलकं वाटेल. आपल्या संवादातूनच अनेक प्रश्नानची उत्तरं सापडतील. सर्वात महत्वाचे आपले संवाद गोपनीय असतील याची मी तुम्हाला खात्री देतो. आपल्या संवादातील एकही अक्षर तिसऱ्या व्यक्तीला कळणार नाही. तुम्ही निसंकोचपणे माझ्याशी संवाद साधा मग बघा तुम्हाला कसं हलकं फुलकं वाटतं. आता वाट कसली बघताय मी खाली दिलेल्या माझ्या मोबाइल क्रमांकावर फोन करा, व्हाट्सअँप वर मेसेज करा किंवा मला ई-मेल वर लिहून कळवा. तुम्ही केलेल्या फोन कॉल व मेसेजला माझ्याकडून प्रतिसाद नक्की मिळेल. माझ्या सारख्या अनोळखी व्यक्ती बरोबर संवाद साधण्यासाठी संकोच वाटत असल्यास तुम्ही ओळखत असलेल्या अश्या व्यक्ती बरोबर तुमच मन मोकळं करा ज्यांच्याशी बोलल्यामुळे तुमचं मन हलकं होईल. वरील पैकी एकतरी पर्याय तुम्ही निवडा असं मी आवर्जून सांगीन. मनावर दडपण घेऊन दिवस ढकलण्यापेक्षा व्यक्त व्हा. मन मोकळं करा. 

 

Image Source : Google

 

वरील अनेक कारणांमुळे काही जणांचा संयम जवळपास सुटलेला असतो. त्यातच जरा काही मना विरुद्ध झाले की प्रचंड राग येतो. त्या रागाच्या भरात वाट्टेल तशी प्रतिकिया दिली जाते. शब्दाला शब्द वाढतो. शाब्दिक चकमक होते. तणाव वाढतो. हे सर्व जाता येता आजू बाजूच्या व्यक्तीं बरोबर, दुकानदारा बरोबर, शेजाऱ्यां बरोबर, बॉस किंवा ऑफिस मधील व्यक्तीं बरोबर किंवा कधी कधी अगदी घरातच आई, वडील, नवरा, बायको, मुलं यांच्या बरोबर घडतं, चिडचिड होते, नाते संबंध दुरावतात, मनावरचं दडपण वाढतं. नाते संबंध नाजूक असतील तर अनेकवेळा बिकट परिस्थिती उद्भवते. समस्या मोठी असेल काही मार्ग सुचत नसेल तर अगदी जीवन संपवण्याचा टोकाचा विचार मनात डोकावतो. असा विचार मनात पक्का झाल्यास त्याची अंमल बजावणी करण्याचा विचार मनात घोळतो. वरील पैकी कोणत्याही टप्प्यावर हा आरोग्य सखा तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुमच्या मनात साचलेल्या चिंता, विवंचना, त्रास, राग, द्वेष, कुचंबणा सर्व काही माझ्याशी बोलून व्यक्त व्हा. तुमच्या मनावर वाढणारा ताण, ओझं, चिडचिड माझ्याशी बोलून मोकळे करा. मला माहीत आहे आपण एकमेकांना ओळखत नाही. तरीही मी तुम्हाला खात्री देतो की आपल्या सुसंवादाचा पूल तुम्हाला आनंदी जीवनाच्या राजमार्गावर घेऊन जाईल.

मानसिक व शारिरीक मार्गदर्शन करण्यासाठी हा आरोग्यसखा वचनबद्ध आहे. तुम्हाला माझ्याशी समक्ष भेटून बोलायचे असल्यास किंवा तुम्हाला समोपदेशकाची आवश्य्कता असल्यास आपण वेळ ठरवून नक्कीच भेटू शकतो. मी माझ्या बाजूने पुढाकार घेऊन पहिलं पाऊल उचललं आहे. आता तुम्ही पुढाकार घेऊन पहिलं पाऊल उचला. आयुष्य सुरेख आहे… सुंदर आहे… मजेत रहा… आनंदी रहा… हसत रहा… स्वस्थ रहा… 

माझ नांव – मनोहर देवधर 

मोबाईल क्रमांक – 9321862636 

ई-मेल आयडी – deodharmanohar4@gmail.com

वेबसाइट – www.aarogyasakha.com 

फेसबुक – https://www.facebook.com/aarogya.sakha.9

चांगल्या आरोग्यासाठी लोकांना मदत करणे हे आरोग्य सखाचे उद्दिष्ट आहे. मसाज, योग, सुजोक, घरगुती उपचार, शारिरीक व मानसिक आरोग्यासाठी सुयोग्य माहिती लोकांपर्यंत पोचवून त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हाच आरोग्य सखाचा हेतू आहे. आरोग्य सखा ने अनेक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक समस्या दूर केल्या आहेत. 

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय द्या; शिवाय हा लेख लाईक व शेअर जरूर करा. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा एखाद्या नवीन विषया बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. 

आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद. 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Anonymous
Anonymous
4 years ago

Very useful blog

venom izle
2 years ago

I think the admin of this website is genuinely working hard in favor of his website, because here every stuff is quality based information. Ernest Semasko