बद्धकोष्ट घरगुती उपचार

Home Remedies on Constipation 

https://www.prakrutijiyofresh.com?aff=63

Effective solution on your health issues available on the above site.
For home delivery & discount please click on the above link and use the code given below.
manohar10

आहार व निद्रा पुरेश्या प्रमाणात होत असल्यास मानवी आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. असे अनेक तज्ञान कडून आपण ऐकतो. पण हे सर्वसाधारणपणे एक सामान्य विधान आहे. कारण उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी योग्य जीवन पद्धतीचा वापर करावा लागतो. त्यात मानसिक स्वास्थ्य, पौस्टिक अन्नघटक (शरीराचा सर्वांगीण विकास करणारे), शुद्ध पाणी, शुद्ध हवा, योग साधना, व्यायाम, झोप या सर्व गोष्टी योग्यवेळी व योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. 

बद्धकोष्ट ही व्याधी होण्या मागील कारणे

बद्धकोष्ट हा आजार बहुतेक वेळा चुकीच्या जीवन पद्धतीमुळे होतो. चुकीची जीवन पद्धती म्हणजे असंतुलित आहार, पाणी किंवा एकूणच द्रव पदार्थ पोटात घेण्याच प्रमाण कमी असणं, अति लोहयुक्त पदार्थाचे सेवन केल्यामुळे, व्यायामाचा अभाव, अति स्थूल शरीर, मल निःसारणास टाळाटाळ, बैठे काम (अनेक दिवस शरीराची खूप कमी हालचाल), विशिष्ठ औषधांचा दुष्परिणाम, सलग काही दिवस गरजे पेक्षा कमी अन्न ग्रहण करणे, अति जागरणं, वेळीअवेळी अन्न ग्रहण करणे, अनेक दिवस ताप येत असल्यास, भूक न लागणे, भोजनात तंतुमय, स्निग्ध व पौस्टिक पदार्थांचा अभाव, अन्न घाईत, लक्ष न देता व पूर्ण न चावल्यामुळे, वात, पित्त व कफ यांचे संतुलन बिघडल्यास. अश्या अनेक गोष्टींमुळे आपली पचन संस्था कमकुवत होते. त्यामुळे पचन क्रियेत बिघाड निर्माण होतो व सुयोग्य कार्य होत नाही. अश्या अनेक कारणांमुळे बद्धकोष्ट ही व्याधी बळावू शकते. 

बद्धकोष्ट ही व्याधी म्हणून जरी आपण बघत असलो तरी बद्धकोष्ट हे पचनसंस्थेत बिघाड झाल्याचे लक्षण आहे. आपले शरीर हे आपल्या शरीरात झालेल्या बिघाडाचे संकेत आपल्याला देत असते. आपल्याला बद्धकोष्ट झालं आहे हे अनेकांना लक्षातच येत नाही. कारण या व्याधीत एकतर वेदना होत नाहीत शिवाय काही जणांना मलावरोध एक दोन दिवसाआड होत असल्यामुळे लक्षात येत नाही. पुढील काही लक्षणं वरून बद्धकोष्ट झाल्याचे समजू शकेल. पोट पूर्ण साफ न होणे, दिवसभरात थोड थोड ३-४ वेळा सौचास होणे, चिकट होणे, सौचास सलग काही दिवस पिवळ्या रंगा व्यतिरिक्त इतर रंगात होणे, सौच करताना खूप जोर लावायला लागणे, सौचास कडक होणे वरील सर्व गोष्टी बद्धकोष्ट या व्याधीशी निगडित आहेत. पण या बद्दलची माहिती अनेकांना नसते. वरील लक्षणांची तीव्रता जेव्हा वाढते तेव्हा बद्धकोष्ट ही व्याधी आपल्याला झाली आहे असे लक्षात येते. यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर अनेक जास्तीचे आजार बळावू शकतात. 

बद्धकोष्ट बळावल्यास गॅस, पित्त, मुळव्याध, भगेंद्र, पोटात / गुदद्वारात अल्सर, बॅड कोलेस्ट्रॉल, वारंवार अपचन, सौचा बरोबर रक्त पडणे, गुदद्वारात खाज येणे, गुदद्वारावर पुळ्या / फोड येणे, पोटात कृमी होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, डोकेदुखी, पोटदुखी, पोटात मळमळणे, झोप न लागणे, पोटात व छातीत जळजळ, उत्साह नसणे, गुदद्वारातून गॅस निघत असताना दुर्गंधी व चिकट स्त्राव बाहेर येणे, आतड्याचा किंवा गुदद्वारात कॅन्सर असे नानाविध आजार होण्याची शक्यता असते. 

Image Source : Google

बद्धकोष्ट ह्या व्याधीचे प्रकार

सौचास न होणे

या प्रकारात सौचास होते असे वाटते पण होत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे आपल्या आतड्याची मल पुढे पाठवण्यासाठी शक्ती कमी पडते. आतड्यांना आलेल्या अशक्तपणामुळे हा त्रास उद्भवतो.  

असंतुलित आहार किंवा स्निग्ध, तंतुमय व पौस्टिक पदार्थांच्या सेवनाचा अभाव यामुळे अशी समस्या उद्भवते. 

घरगुती उपचार

आतडयांना शक्ती वर्धक असलेल्या काळ्या मनुका. साधारण १५-२० मनुकांवर पाव लिंबू पिळावे व ते एकत्र कुटावे. कुटून तयार झालेली चटणी उपाशीपोटी कोमट पाण्या बरोबर घ्यावे.

डाळींबाचे दाणे किंवा रस सेंधव मीठ घालून उपाशी पोटी सेवन करावे. 

एक चमचा तुपामध्ये एक चिमूट सेंधव मीठ घालून ते दोन्ही वेळच्या जेवणात सेवन करावे.  

काही दिवस एक ग्लास भरून दुधी भोपळ्याचा रस प्यावा. 

सौचास चिकट होणे

या प्रकारात सौच कमी प्रमाणात होते. यात सौच हे सौच कुपास चिकटून बसते पाणी टाकून सहज वाहून जात नाही. 

आतड्यांची पचन शक्ती कमी पडल्यास, अन्न नीट न चावता ग्रहण केल्यास, जेवताना खूप थंड पाणी प्यायल्यास,आमाची निर्मिती होते. अन्न न पचवता तसेच पुढे पाठवले जाते त्या प्रक्रियेत अन्न सडते. असे सडलेले अन्न आतड्यात साचते व चिकट होत जाते. असा चिकटा आतड्यातून पुढे खूप हळू हळू सरकतो.  

घरगुती उपचार

अर्धा चमचा हरडा पावडर + पाव चमचा सुंठ पावडर + एक चिमूट सेंधव मीठ याचे मिश्रण जेवणाच्या आधी कोमट पाण्याबरोबर घ्यावे. 

एक चमचा त्रिफळा चूर्ण रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्या बरोबर घ्यावे. 

सौचास कडक होणे

यात प्रामुख्याने गुदद्वारावर फिशर होणे, दुखणं, खाज येणं, रक्त येणं. कडक सौचास होत असल्यामुळे सहाजिकच जोर लावावा लागतो. जोर लावूनही विस्टा बाहेर येत नसल्यामुळे आणखी जोर लावला गेल्यास गुदद्वारात जखम होण्याची शक्यता असते. 

आपल्या आतड्यांमध्ये कोरडेपणा / रुक्षता आल्यामुळे आतड्यातील मल कडक होतो. आतड्याच्या रुक्षतेमुळे मल बनण्याची क्रिया खूप संथपणे चालते. त्यामुळे मल पुढे सरकण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे सौचास कडक होते. 

घरगुती उपचार  

आतड्यांमधील कोरडेपणा / रुक्षता कमी करण्यासाठी उपाय म्हणजे एक चमचा तुपामध्ये एक चिमूट सेंधव मीठ घालून ते दोन्ही वेळच्या जेवणात सेवन करावे. 

एक कप पाण्यात एक चमचा बडीशेप घालून उकळवून घ्यावे. अर्धा कप काढा तयार झाल्यावर त्यात एक चमचा एरंडेल तेल घालून उपाशी पोटी प्यावे.  

एक चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना कोमट पाण्या बरोबर घ्यावे.

Image Source : Google

आपल्या पचन संस्थेचं आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जाणीव पूर्वक काही गोष्टी करणे गरजेचे आहे. आहारात स्निग्ध, तंतुमय व पौस्टिक पदार्थांचा समावेश असावा. आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्या प्रत्येक अन्नघटकाचा पाचन काळ वेगवेगळा असतो. जड पदार्थांचे पचन होण्यासाठी वेळ लागतो. प्रत्येक व्यक्ती नुसार हा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. सर्व साधारणपणे जडान्न पचनासाठी सहा ते आठ तास इतका वेळ लागतो. म्हणूनच अन्नग्रहण करताना रात्रीच्या वेळेस आहार हलका व सूर्यास्त झाल्यावर लगेचच करावा. महिन्यातून किमान २-३ दिवस लंघन करावे. लंघन वेगवेगळ्या प्रकारे करता येते. दिवसभरात फक्त द्रव पदार्थ घेऊन करू शकतो त्यात नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत, फळांचा रस असे द्रव पदार्थ सेवन करावे. किंवा दिवसभरात दुपारी मुगाचे साधे वरण व भात एकदाच आहार घ्यावा व संध्याकाळी एक कप दूध प्यावे. 

रोज सकाळी पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर ३-४ ग्लास कोमट / साधे पाणी प्यावे त्यामुळे मोठ्या आतड्यावर दबाव निर्माण होऊन सौचास साफ होते. याची जाणीवपूर्वक सवय लावून घेतल्यास बद्धकोष्ट नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. रोज सकाळी नियमितपणे कोठा साफ होऊन सौचास दुर्गंधी येत नसल्यास, शौचास पिवळे व सोललेल्या केळ्या प्रमाणे होत असल्यास आपली पचन संस्था निरोगी व सशक्त आहे असे समजावे. 

वर्षातून किमान एकदा सलग तीन दिवस जंताचे औषध घ्यावे. पुढील घरगुती उपाय केल्यास फायदेशीर होईल. एक चमचा ओवा + एक चिमूट काळे मीठ + २-३ काळेमिरी एकत्र कुटून गरम पाण्याबरोबर रात्री झोपताना प्यावे. 

तीन दिवस सलग डाळींबाच्या सालींचा काढा सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्यावा. 

तीन दिवस सलग एक चमचा वावडिंग + ओवा पावडर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. 

तीन दिवस सलग २-३ लसणीच्या पाकळ्या + १०-१२ काळ्या मनुका उपाशीपोटी चावून खाल्यास जंत व कृमिनचा नायनाट होतो. 

वर दिलेले सर्व घरगुती उपचार हे एकाचवेळी करु नये. वरील उपचार हे व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतात. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार व धन्यवाद. 

5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments