पाणी पिण्याच्या पद्धती व त्याचे फायदे

Methods to drink water and its benefits

प्रकृती जियो फ्रेश म्हणजेच डॉक्टर सुयोग दांडेकर यांचे मानवी देहाला होणाऱ्या विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी आयुर्वेदिक उत्पादने पुढील वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 

https://www.prakrutijiyofresh.com/?aff=63


वरील  लिंकला क्लिक करून उत्पादने खरेदी करा. खरेदी करताना पुढील कोडचा वापर केल्यास. आपणास १०% डिस्काउंट मिळेल. manohar10

वास्तव 

निरोगी शरीर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण निरोगी शरीर ठेवण्यासाठीची बंधन व नियम काटेकोर पणे पाळली जात नाहीत. त्याच मुख्य कारण म्हणजे आधुनिक दिनचर्या यात प्रामुख्याने अनेकांचे काम-धंद्याचे ठिकाण घरा पासून लांब असते. त्यामुळे प्रवासात वेळ व शक्ती खर्च होते. त्यामुळे दगदग होते. कामाच्या ठिकाणी काम करताना अनेकांना मानसिक दडपणाखाली काम कराव लागत. नोकरी निमित्य काहींना वेगवेगळ्या पाळीमध्ये काम कारव लागत तर काहींना डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे जेवणाच्या व झोपण्याच्या वेळा निश्चित नसतात. अश्या परिस्थितीत लंच टाइम झाला म्हणून जेवण जेवले जाते. तसेच झोपेच्या बाबतीत ही घडत असते. कारणं काहीही असोत अनेकांना भुकेच्या वेळेला जेवण व झोपेच्या वेळेला झोप मिळत नाही. अश्या दिनचर्ये मागे छुपे कारण म्हणजे गरज व स्पर्धात्मक वातावरण. ह्या सर्वांचे दुष्परिणाम आपल्या मनावर व ओघाने शरीरावर होत असतात. यात वेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विद्यार्थीवर्ग ही भरडला जात आहे. आज अनेकांना गरज म्हणून किंवा नाईलाजास्तव अश्या स्पर्धात्मक शर्यतीत धावावं लागत आहे. त्यात भर कर्ज, ईर्षा, अभिमान, अवास्तव अपेक्षा, पत, मोठी स्वप्न, अपयश, आजारपण, नात्यांमधील तणाव ह्या सर्व गोष्टींचे ही कळत नकळत शरीरावर दुष्परिणाम होत असतात. ह्या साऱ्या गोष्टी व्यक्ती सापेक्ष असल्या तरी लहानां पासून मोठ्यां पर्यंत व गरीबा पासून श्रीमंता पर्यंत कमी अधिक प्रमाणात साऱ्यांनाच बरे वाईट परिणाम मनावर व शरीरावर होत असतात. 

निरोगी राहण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या तज्ञान कडून वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातील योग्य त्या गोष्टींचा अवलंब आपण करत असतो. सांगणारे बरेच तज्ञ अश्या मुद्यावर व तत्थ्यावर उदाहरणा सहित माहिती देत असतात की आपल्याला त्यांचे मुद्दे पटतात. पण कधी कधी एकाच मुद्यावर दोन तज्ञानची दोन वेगळी मत असतात. ज्याला जो मुद्दा त्या तज्ञाचा पटतो तो त्यांचा सल्ला ऐकून त्यावर अंमल बजावणी करत असतो. पण ह्या सर्व गोष्टींनमुळे सामान्य माणूस संभ्रमित होत असतो.

सद्य स्थिती

कोविड १९ च्या थैमान काळात सर्वच गोष्टींचे संदर्भ बदलले आहेत. वरील अनेक गोष्टीं पासून अनेक जण आता शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देत आहेत. कारण “सर सलामत तो पगडी पचास” हे आता खऱ्या अर्थाने पटलं आहे. ह्याच काळात शरीर स्वास्थ्या कडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन व त्यावर होणारी अंमल बजावणी आपण बघत आहोत.

आयुर्वेदा नुसार आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ हे त्रिदोष  व उष्णता नियंत्रित असतील तर आपणास कोणताही आजार होणार नाही हे आयुर्वेदाचे पहिले तत्व आहे. ह्या सर्व गोष्टी नियंत्रित करण्यासाठी आपला योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, पुरेसं पाणी, मानसिक स्वास्थ्य यांच्या एकत्रीत दूरगामी सकारात्मक परीणाम शरीरावर होत असतात. 

आपले शरीरस्वास्थ्य टिकवण्या साठी महर्षी वाग्भट यांनी बरीच महत्वाची सोपी सूत्र सांगितली आहेत. त्या सूत्रांचे पालन आपण केले तर त्याचा नक्कीच आपल्या स्वास्थ्या साठी लाभ होईल. त्यातील काही सुत्रार्थ पुढील प्रमाणे. 

महर्षी वाग्भट यांनी सांगितलेल्या काही सोप्या सूत्रांचा सूत्रार्थ 

◉   जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये 

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये या सुत्रा मागील कारण असे आहे की; जेव्हा आपल्याला भूक लागते म्हणजेच आपल्या जठरातील अग्नी पेटलेला असतो. हा जठर अग्नी अन्न पचनाचे काम करतो. त्यास जठराग्नी असे म्हणतात. जर आपण जेवण झाल्यावर पाणी प्यायलो तर जठराग्नी विझून जाईल त्यामुळे अन्न पचनाची क्रिया होणार नाही व ते अन्न सडण्याची क्रिया सुरु होईल व तसेच पुढे सरकत राहील. अश्या सडलेल्या अन्नातून पित्ताची निर्मिती जास्त प्रमाणात होते व त्यामुळे पित्ता संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून पाणी पिताना जेवणाच्या आधी १ तास व जेवण झाल्यावर १ तासा नंतर पाणी पिऊन चालते. 

◉   पाणी घोट घोट प्यावे 

बऱ्याच व्यक्तीना पाणी घट घट पिण्याची सवय असते. त्या मुळे पाणी पिण्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. शिवाय आपल्या मूत्रपिंडावर अचानक पाण्याचा दाब वाढतो व असे वारंवार होत राहिल्यास मूत्रपिंडाचे गंभीर आजार उद्भवू शकतात. आपण कोणताही गरम द्रवपदार्थ जसे एक एक सिप करून पितो म्हणजेच एक एक घोट पितो त्याच प्रमाणे पाणी घोट घोट प्यावे. पाणी घोट घोट प्यायल्याने पाण्याच्या प्रत्येक घोटाबरोबर तोंडातील लाळ मिसळली जाते ही लाळ क्षारी असते जे पोटातील आम्ला मध्ये मिसळ्यावर आम्ल निवळते त्यामुळे आम्लाचा प्रभाव कमी होतो. पोटातील बरेचसे आजार आम्ला मुळे होत असतात. लाळयुक्त पाणी प्यायल्याने आपोआपच आम्लावर म्हणजेच पित्तावर नियंत्रण राहते. आयुर्वेदानुसार ज्यांच्या पोटातील पित्त शांत असेल त्यांना पित्ताचे आजार कधी होणार नाहीत. पित्त वाढल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. म्हणूनच ऍलोपेथिमध्ये अनेक उपचारा मध्ये इतर औषधांमुळे पित्त वाढू नये म्हणून पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी औषध दिले जाते. 

◉   सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यावे

आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर दात न घासता २-३ ग्लास कोमट पाणी प्यावे. या मागे महत्वाचा उद्देश म्हणजे रात्रभर तोंडात साठलेली लाळ त्या पाण्या बरोबर पोटात जाते. त्या लाळेचे व घोट घोट पाणी पिण्याचं महत्व आपण वरती पाहिल आहेच. त्याच बरोबर सकाळी आपण जे पाणी पितो ते पाणी रात्रभरात तयार झालेल्या मोठ्या आतड्यातील मळावर दाब निर्माण करते त्या मुळे लगेचच पोट साफ होण्यासाठी चांगली मदत होते. विना सायास पोट साफ होते. 

◉   कधीही थंड पाणी पिऊ नये 

हा नियम वाचून अनेकांच्या भिवया उंचावतील व डोळे प्रश्नार्थक होतील. भारतात हिवाळ्यातही अनेक ठिकाणी उष्ण हवामान असते. तर उन्हाळ्यात अंगाची लाही होते व घशाला कोरड पडते त्यावेळेस फ्रीझ, कुलर, ए सी, आईस्क्रीम, कुल्फी, बर्फ़ाचे गोळे ह्याच गोष्टींची आवश्यकता जास्त वाटते. पण आयुर्वेदा नुसार साधे किंवा गरम पाणी शरीरासाठी योग्य व आरोग्यदायी असते. याचे कारण असे आहे की; प्रत्येक मनुष्याला विशिष्ठ शारिरीक तापमान असते. हे तापमान कमी किंवा अधिक झाल्यास शरीरांतर्गत बिघाड झाल्याचे संकेत त्यातून मिळतात. मानवी शरीरात नैसर्गिक दृष्ट्या बरीच सहनशक्ती (+/-Tolerance) असते. त्या सहन शक्तीच्या बाहेर काही गोष्टी जात असतील तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच दिसायला लागतात. थंड पाणी प्यावंसं वाटल्यास माठातील पाणी चालू शकेल. पाणी नेहमी बसून प्यावे. आपण जे काही अन्न व पाणी ग्रहण करतो त्यात सरासरी ६० ते ७० टक्के पाण्याचा अंतर्भाव असावा. याचा अर्थ सर्व अन्नघटकात असणारे पाणी व शुद्ध पाणी यांची एकत्रित सरासरी तेव्हडी असल्यास आरोग्यासाठी चांगले असते. चोवीस तासात साधारण ३-४ लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. (हे प्रमाण व्यक्ती, स्थल व ऋतू नुसार कमी जास्त होऊ शकते) वरील सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यास आरोग्यासाठी खुपच लाभकारक ठरेलच शिवाय खऱ्या अर्थाने वॉटर थेरेपी होईल.

कोणताही अन्नपदार्थ सेवन केल्यावर सर्व प्रथम पोटातील यंत्रणा त्या पदार्थाला अंतर्गत पोटाच्या तापमाना इतके तापमान करण्यामध्ये एनर्जी खर्च करते. त्याच्या  पुढे पचनक्रिया सुरु होते. थंड पदार्थामुळे पोटातील जठराग्नी थंड पडतो. अन्नमार्ग थोडा आकुंचन पावतो. पचनाची क्रिया नीट होत नाही. असे वारंवार होत राहिल्यास अनेक व्याधी उद्भवतात. 

सरासरी ६० ते ७० टक्के पाणी मानवी शरीरात असते. पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा अपुरे पाणी सेवन केल्यामुळे विविध व्याधी उद्भवू शकतात. मनुष्य अन्ना शिवाय काही आठवडे जगू शकतो. पण पाण्या शिवाय ४-५ दिवसचं जगू शकतो (हे प्रमाण व्यक्ती सापेक्ष आहे. माणसाच्या शारिरीक हालचाली नुसार कमी अधिक कालावधी होऊ शकतो.) म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. आपल्या शरीरातील पाणी हा घटक किती महत्वाचा आहे हे या वरून लक्षात येते. 

आपल्या नवीन मोबाईलची व वाहनाची काळजी आपण जेवढी घेतो त्या पेक्षा खूप कमी काळजी आपण आपल्या शरीराची घेतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. आज अगदी शाळेतील मुलांपासून मोठ्यानं पर्यंत अनेकांना मोबाईल स्वास्थ्याची काळजी कशी घ्यावी याची चांगली माहिती असते. तेव्हडीच काळजी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी किती घेतली जाते हा खरा प्रश्न आहे. जेव्हा स्वतःचे शरीरस्वास्थ्य बिघडते तेव्हा खऱ्या अर्थाने शरीरस्वास्थ्या कडे जाणीव पूर्वक लक्ष दिले जाते. तोपर्यंत अनेक व्यक्ती स्वतःच्या शरीराला गृहीत धरत असतात. 

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार. 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Anonymous
Anonymous
4 years ago

खूप छान माहिती

Anonymous
Anonymous
4 years ago

छान माहिती

Anonymous
Anonymous
4 years ago

अतिशय उपयुक्त आणि नव्या पिढीला सोप्या व सरळ भाषेत जागृत करेल अशी माहिती. 👍
धन्यवाद 🙏