नवजात शिशु व बाळंतीणीसाठी भारतीय शास्त्रोक्त मसाज करण्याचे फायदे

Benefits of Indian Scientific Massage for New Born Baby and Mother

पहिल्या भागात आपण मसाज करण्याचे महत्व व त्याचे फायदे पाहिले; त्यातूनच आपल्याला मसाज या विषयाचे महत्व लक्षात आले असेलच. 
आपण आयुर्वेदाचे आभार मानू तेव्हडे थोडे आहेत. मसाज हे अबाल वृद्धानसाठी वरदान आहे. आपल्या आयुष्याची सुरुवात अगदी जन्मा पासून मसाज करून होते. लहान बाळं तेला पाण्यावर वाढतात अस वाक्य बऱ्याच जुन्या व्यक्तीं कडून आपण ऐकले असेलच. चलातर बाळांच्या मसाजा बद्दल जाणून घेऊया. 
जन्मजात शिशु ची त्वचा खूपच कोमल असते त्यामुळे बाळांचा मसाज करताना विशेष काळजी घ्यावी लागते. मसाज करताना तीळाचे, खोबऱ्याचे किंवा बदामाचे तेल वापरल्यास बाळाच्या स्नायूंना लवकर चांगली बळकटी मिळण्यास मदत होते. बाळाची वाढ चांगली होते. टाळू मजबूत होण्यास मदत होते. तेल वापरताना ऋतुमाना नुसार वापरावे जसे उन्हाळ्यात खोबरेल तेल वापरावे. आयुर्वेदा नुसार बाळाच्या कानात तेल सोडणे बाळाच्या आरोग्या साठी चांगले असते. बाळाला हाताळताना खूपच काळजीपूर्वक हाताळावे. बाळाला मान सावरता येत नसल्या मुळे मानेला आधार देणे जास्त गरजेचे असते.  मसाज करताना थोडे थोडे तेल लावून हळुवार जिरवावे. एक एक अवयवाचा मासाज झाल्या नंतर त्या त्या अवयवाला व्यायाम द्यावा. 

पायाचा मसाज

Img Source:Google

पायाला मसाज करताना पायाचे सर्व सांधे मसाज करणे. सांध्यांना गोलाकार पद्धातीने मसाज करावा. पायाचा व्यायाम करताना बाळाचे दोन्ही पाय उचलून कपाळा पर्यंत नेणे. नंतर गुढगे छाती जवळ नेणे. नंतर गुढग्यात पाय दुमडून पुढे मागे करणे. हे सर्व ३ ते ५ वेळा करावे.  

हाताचा मसाज

Img Source:Google

हाताचा मसाज करताना हाताच्या बोटानं पासून खांद्या पर्यंत मसाज करावा. खांदा, कोपर व मनगटाला गोलाकार मसाज करावा. हाताला व्यायाम देताना हात वर, खाली, बाजूला ३ ते ५ वेळा करावे. हाताची उलट-सुलट घडी घालावी. 

पोटाचा मसाज

Img Source:Google

पोटाचा व्यायाम करताना नाभिमध्ये २-३ थेंब तेल सोडावे तसेच पोटाला डावी कडून उजवी कडे असे घड्याळाच्या दिशेने मसाज करावा. छातीला हात पंखा प्रमाणे दोन्ही बाजूला पसरवून मसाज करावा.

पाठीचा मसाज

Img Source:Google

पाठीचा मसाज करताना पाठीचा कणा व कंबरे कडील भागावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मेंदूमधून निघणाऱ्या मध्यवर्ती मज्जातंतूंचे जाळे पाठीच्या माणक्या मधून सर्व शरीरभर पसरलेले असते. मसाज करताना कंबरे पासून वरती मानेपर्यंत म्हणजे खालून वर अश्या पद्धतीने मसाज  करावा. 

डोक्याचा मसाज

Img Source:Google

डोक्याचा मसाज करताना टाळू वर दाब देऊ नये. टाळूवर थोडे थोडे तेल ओतून बोटाने वरच्यावर टाळूमध्ये जिरवावे. बाकी डोक्याला हलक्या हातानी मसाज करावा. तसेच तोंडाला मसाज करताना हनुवटी पासून कपाळा च्या दिशेने मसाज करावा. मसाज हलक्या हातानी करावा. 

बाळंतीण स्री चा मसाज

बाळंतीण स्रीला मसाज दिल्याने तिची शारिरीक झीज भरून येते. थकवा जातो, स्नायूंना लवकर बळकटी येते. बाळंतीण स्री चा मसाज करायच्या आधी बाळंतीण स्री नैसर्गिकरित्या बाळंत झाली आहे की तिची शल्य चिकित्सा झाली आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर शल्य चिकित्सा झाली असेल तर त्या भागात ३ महिने मसाज करू नये. मसाज करणे आवश्यक असल्यास तज्ञानच्या सल्याने मसाज करावा. बाळ झाल्यावर शारिरीक थकवा जास्त जाणवतो. स्नायू शिथिल झालेले असतात. एकूणच शारीरिक झीज खूप झालेली असते त्या मुले अश्या स्री ला मसाज अत्यंत आवश्यक असतो. मसाज करण्यासाठी तिळाचं, खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल प्रामुख्याने वापरतात. शल्य चिकित्सा झालेल्या जागेवर मसाज करू नये. शल्य चिकित्सा झाल्यावर मसाज करायचा झाल्यास प्रामुख्याने पाठीला व कमरेला मसाज देताना बाळंतीण स्त्रीला कुशीवर झोपवून किंवा बसवून मसाज करावा. मसाज कंबरे पासून माने पर्यंत खालून वर करावा. पोटाला व स्तनांना हळुवार मसाज करावा.  
वरील सर्व मसाज तज्ञानच्या सल्याने करावा.

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.  

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments