Worldwide 7 popular massage methods
जागतिक स्तरावर मसाज चे महत्व खूपच वाढत चालले आहे. देश विदेशात त्याचा प्रत्यय आपणास येत असतो. काही देशां मध्ये तर खास मसाज केंद्रांचे मार्केट आहे. त्या त्या देशातील खास पद्धत अनुभवण्यासाठी पर्यटक तिथे जाऊन मसाज घेत असतात
एकाच गावातल्या दोन वेगवेगळ्या मसाजिस्टची मसाज करण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. मसाज करण्याचे तंत्र वेगवेगळे असते. तसेच विविध देशात मसाज करण्याचे तंत्रही वेगवेगळे असते. त्या विशिष्ठ पद्धतीनं वरून कोणता मसाज आहे हे सहज ओळखता येते. योग्य पद्धतीने केलेला मसाज मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. मसाज हा शरीरास आराम मिळण्यासाठी केला जातो शिवाय काही व्याधींवर उपचार म्हणून पण केला जातो.
◉ भारतीय मसाज
भारतीय मसाज हा प्रामुख्याने शरीरास आराम मिळण्यासाठी, निरोगी आरोग्या टिकवण्यासाठी, आयुर्मान सुधारण्यासाठी, व्याधींवरील उपाय योजनेसाठी केला जातो. संपूर्ण शरीराचा मसाज करण्यासाठी विविध ११ मसाज पद्धतिंचा वापर करून केला जातो. त्यातील काही विशीष्ठ पद्धती विशिष्ठ अवयवांसाठी वापरतात. असा संपूर्ण मसाज घेतल्याने रक्ताभिसरण चांगले होते. शरीरास आराम मिळतो. स्नायू लवचिक व बळकट होतात. तरतरी येते. उत्साह वाढतो. आयुर्मान सुधारते. त्वचा तुकतुकीत होते. हा मसाज लहान बाळा पासून वृध्दांन पर्यंत कोणीही करून चालतो

◉ अरोमा मसाज
अरोमा मसाज म्हणजे आपण मसाज करण्यासाठी जे कोणते तेल वापरतो त्यात सुगंधी द्रव्यांचा वापर करून मसाज करणे. ही वनस्पती द्रव्य आपल्या शरीरासाठी खुपच उपयुक्त असतात. निसर्गा मधील विविध वनस्पतींच्या विविध भागातून सुगंधी द्रव्य बनवले जाते. जसे काही वास्पतींच्या पानां पासून तर काहींच्या फुलां पासून तर काहींच्या खोडा पासून सुंगंधी द्रव्य बनवतात. ही सुगंधी द्रव्ये नुसताच सुगंध देत नाहीत तर त्यांच्यात औषधी गुणधर्मपण असतात. या सुगंधी द्रव्यांचा वापर हा शरीराला आराम मिळण्यासाठी व विविध व्याधींवर मात करण्यासाठी केला जातो. भारतीय आयुर्वेदा मध्ये सुगंधी द्रव्ये वापरण्यास सांगितले आहे. तसेच हा प्रकार स्वीडिश पद्धती मध्ये गणला जातो.

◉ थाई मासाज
मसाज म्हटलं की आपल्या डोळ्या समोर येते ते अंगाला तेल चोपडून रगडणं. पण थाई मासाज मध्ये तेलाचा वापर करत नाहीत. स्नायुना व सांध्यांना दाब व ताण देऊन मसाज करतात. सांध्यांची सर्व बाजूने हालचाल करतात व दाब देतात त्यामुळे सांध्यांची हालचाल सुलभ होते. थाई मसाज करताना मसाजिस्ट त्याच्या दोन्ही हातांचा व पायांचा वापर करून प्रसंगी मसाज घेणाऱ्याच्या अंगावर बसून अवश्यक त्या स्नायूंवर कमी अधिक दाब देतात. हा मसाज केल्या नंतर शरीराला आराम मिळतो. स्नायूंमध्ये लवचिकता वाढून बळकटी येते.

◉ हॉट स्टोन मसाज
ह्या मसाज मध्ये उत्तर अमेरिकेच्या आध्यात्मिक तत्वांचा समावेश आहे असे मानतात. हा मसाज करताना विशिष्ठ दगडाचा वापर करतात. हा दगड सर्वसाधारणपणे बसाल्ट प्रकाराचा असतो. काही थेरपिस्ट सागरी दगड वापरतात तर काही थेरपिस्ट वाळूचा खडक किंवा चुनखडी वापरतात. चुनखडी मधला खनिज गुणधर्मामुळे याचे फायदे जास्त मिळतात असे काही मसाजिस्ट मानतात. हे सर्व दगड चपटे, अंडाकृती व हाताच्या पंज्यात मावतील एवढ्या आकाराचे असतात. हा मसाज करताना थोडे तेल लावून नंतर विस्तवावर गरम केलेले दगड हातात घेऊन अंगावर दगडाने मसाज करतात. अनेक वेळा स्नायू दुखावला असताना जसे गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतात. तसाच हा प्रकार आहे यात शेक तर मिळतोच सोबत मसाज पण केला जातो. ह्या मसाज मुळे स्नायूंना आराम मिळतो.

◉ स्वीडिश मसाज
स्वीडिश मसाज हा प्रख्यात व बऱ्याच वेळेस उपचार म्हणून वापरला जाणारा मसाज प्रकार आहे. स्वीडिश मसाज मध्ये लोशन किंवा तेल वापरून मसाज केला जातो. ह्या मसाज मध्ये लांब व मोठे स्ट्रोकस वापरून मसाज करतात. यात प्रामुख्याने पाच वेगवेगळे स्ट्रोक्स वापरतात. या विविध स्ट्रोक्स मुळे स्नायूंना चांगला आराम मिळतो. या मसाज मुळे रक्ताभिसरण चांगले होते व कडक झालेले स्नायू लवचिक व मजबूत होतात

◉ डिप टिशू मसाज
डिप टिशू मसाज हा एक बिंदू मसाज प्रकार मानला जातो. कारण या प्रकारात स्नायूंच्या एकएक बिंदूवर हाताच्या कोपरानी दाब देऊन तो दाब काही काळ तसाच ठेवून स्नायूंना आराम दिला जातो. हा प्रकार थोडा वेदनादायी आहे. हाताचे कोपर वापरून दिलेल्या दाबावा मुळे स्नायूंना जोडणार्या आतल्या उतीं पर्यंत हा मसाज पोचतो. त्या मुळे स्नायूंना लवकर आराम मिळतो. स्नायू कडक किंवा खूप ताठर झाले असतील तर हा मसाज फायदेशीर ठरेल

◉ स्पोर्ट्स मसाज
खूप जास्त कष्ट किंवा श्रम झालेल्या व्यक्तींनी हा मसाज केल्यास त्यांना लवकर आराम मिलतो. ज्या खेळांमधे शरीराची भरपूर हालचाल होते व ज्या खेळात स्नायूंचा खूप जास्त वापर केला जातो अश्या सर्व खेळाडूंसाठी हा मसाज खूपच फायदेशीर आहे. या मसाज मध्ये स्नायूंवर व सांध्यांवर जास्त लक्ष देऊन लवकरात लवकर आराम मिळेल अश्या पद्धतीने मसाज करतात

मसाज क्षेत्रात खूप वेगवेगळी तंत्र वापरली जातात. समस्ये नुसार व गर्जे नुसार या मसाज चा अवलंब केल्यास नक्कीच आरोग्यदायी, आरामदायी व फायदेशीर ठरेल. वरील कोणताही मसाज प्रकार स्वतःसाठी निवडताना तज्ञानचा सल्ला जरूर घ्या
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
Very nice info.