तुमचे स्वयंपाक घर घरगुती उपचारासाठी छोटे औषधालय आहे

Your kitchen is small medical store for Home Remedies    

सध्याच्या आधुनिक जीवनात लहानां पासून मोठ्यान पर्यंत सर्वांनाच खूपच धावपळ व दगदग करावी लागते. अश्यातच हवामानात बदल, साथीचे आजार, वेळीअवेळी जेवण व झोप, चौरस आहाराचा व व्यायामाचा अभाव व स्वतःच्या आरोग्या कडे बघायला ही वेळ न मिळणं अश्या अनेक कारणानमुळे काही ना काही त्रास, आजार, व्याधी उद्भवत असतात. फार पूर्वी पासून अनेक आजारांवर घरगुती उपचार करण्यासाठी आजीबाईचा बटवा खूपच प्रसिद्ध होता. जुन्या काळात पिढ्यान पिढ्या घरगुती उपचार पद्धती वापरून अनेक छोट्या छोट्या आजारांवर मात करत असत. त्यात हे उपचार करताना अनुभवाची पण भर पडत असे. त्या मुळे नवनवीन आजारांवर घरच्या घरीच खूप चांगले सकारात्मक परिणाम देणारे व कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम न करणारे घरगुती उपचार उपलब्ध आहेत.

काही आजार रात्री अपरात्री उद्भवतात तर कधी प्रवासात असताना किंवा आपण तज्ञान पासून लांब असताना तर कधी कधी तज्ञ उपलब्द नसताना उद्भवतात अश्यावेळी घरगुती उपाय फायदेशीर होतो. आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास तज्ञानचा सल्ला जरूर घ्यावा.
घरगुती उपचार पद्धती मध्ये ज्या पदार्थांचा आपण वापर करणार आहोत त्यातील बहुतेक पदार्थ अनेकांच्या घरात असतातच. कारण ते सर्व पदार्थ आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. आपलं स्वयंपाक घर व त्यात असलेला मिसळणाचा / फोडणी करायचा डबा म्हणजे एक छोटेखानी औषधालय आहे असे म्हटलं तर वावगं ठरू नये. 

Img. Source Google

घरगुती उपचार पद्धती म्हणजे आयुर्वेद उपचार पद्धतीचाच भाग आहे. कारण यात नैसर्गिक घटकांचाच उपचारासाठी वापर करतात. मसाल्याचे पदार्थ म्हणून जे काही पदार्थ आहेत त्या प्रत्येकात औषधी गुणधर्म आहेत. आपण मसाल्याचे पदार्थ म्हणून जे पदार्थ वापरतो त्यांना अष्टांगह्रदयम् या ग्रंथात महर्षी वाग्भट यांनी औषधी असे संबोधले आहे. 

महर्षी वाग्भट यांनी आपल्या आरोग्यासाठी ५ सूत्रे सांगितली आहेत.

१)  आपले जेवण बनवताना सूर्यप्रकाश व हवा यांचा स्पर्ष झाला नसेल तर ते जेवण जेवू नये

याचा अर्थ म्हणजे अन्न कोंदट जागेत किंवा काळोख्या जागेत शिजवलेले अन्न ग्रहण करू नये. आधुनिक काळात आपण प्रेशर कुकर, ओव्हन, फ्रीझ वापरतो हे सर्व वरील सूत्राच्या विपरीत कार्य करतात. आधुनिक तंत्रज्ञानी भारावलेले व सोईचे म्हणून बिनदिक्कत स्वीकारलेल्या वरील वस्तूंचा मानवी शरीरावर विपरीत परीणाम होत असतात.  

२)  अन्न शिजवल्या पासून ४८ मिनिटाच्या आत ते अन्न खायला हवे.

ताजे अन्न खावे असे आजही तज्ञ मंडळी आपल्याला सांगत असतात. बऱ्याच वेळा शिजवलेले अन्न साधारण ४८ मिनिटा नंतर खराब होण्याची प्रक्रिया सुरु होते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळा व पावसाळ्यात हि प्रक्रया थोडी उशिरा सुरु होते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे त्यांनी वरील नियम कटाक्षाने पाळावा. 

३)  कोणत्याही धान्याचे पीठ; पीठ बनवल्या पासून १५ दिवसाच्या आत वापरावे.

कीड, मुंगी लागू नये म्हणून औषध प्रक्रिया करून हवाबंद पद्धतीने धान्य साठवल्यास एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी पर्यंत धान्य टिकते. मात्र त्याच धान्याचं पीठ करून ठेवल्यास सर्वसाधारणपणे पीठ पंधरा दिवस खाण्या योग्य असते. त्या नंतर त्या पिठात सूक्ष्म जीव तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. (हा नियम पूर्वीच्या काळा नुसार असून आजच्या काळात खाद्य पदार्थ टिकवण्यासाठी आधुनिक साधन उपलब्द आहेत.) तरी शक्यतो पीठ ताजे असतानाच वापरावे.

४)  शरीरासाठी रोज व्यायाम / शारिरीक श्रम अवश्यक आहे.  

खर तर जन्मलेल्या बाळा पासून वयोवृद्ध व्यक्तीं पर्यंत प्रत्येकाला शारिरीक व्यायाम आवश्यक आहे. जन्मलेले बाळ जेव्हा त्याचे हात पाय हलवतं तो त्यांचा व्यायाम असतो. शिवाय बाळाला तेल लावून बाळाच्या हाता पायाच्या हालचाली करून मुद्दाम व्यायाम दिला जातो. कुमार / कुमारी अवस्थेत मैदानी खेळातून किंवा त्यांच्या धावण्या बागडण्यातून त्यांचा व्यायाम होत असतो. वयवर्ष साधारण १६ ते १८ पासून व्यायाम शाळेतील व्यायाम व कष्टाची कामे करावीत. वय वर्ष साठ नंतर व्यायाम व कष्ट हळू हळू कमी करत जावे. अगदी उतार वयात बसल्या जागी किंवा झोपून हात, पाय, मान, पाठ व कंबर यांचा शाळेत पिटी करताना जश्या हालचाली करतो तश्या कराव्यात. (आधुनिक काळात बरेच नियमांचे संदर्भ बदलत आहेत. आजच्या स्पर्धाच्या युगात आपण त्याचा प्रत्यय घेत आहोत.) 

५)  वातावरणातील बदलावर लक्ष देणे

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा अश्या सर्व ऋतुं मध्ये हवामानात खूप बदल होतो. शिवाय प्रत्येक ऋतु पूर्ण होई पर्यंत त्या त्या ऋतूची तीव्रता कमी अधिक होत असते. ह्या सर्वांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊनये त्या दृष्टीने आपले आहार, व्यायाम व एकूणच दिनचर्या यात योग्य तो बदल करावा. 


वरील पाच सूत्रांचा वापर आपल्या रोजच्या जीवनात केल्यास मानवी जीवनास  फायदेशीर ठरेल. काळानुसार, गरजेनुसार व व्याक्ती नुसार वरील सुत्रा प्रमाणे कमी अधिकपणा प्रत्येकाच्या दिनचर्येत आपणास दिसून येतो. 

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.  

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments