केस गळतीवर घरगुती उपाय

Home Remedies For Hair Fall

Shop Now :
https://family.style4sure.com/

केवल ₹ 499/- में 10000+ उत्पादों के साथ ऑनलाईन व्यापार शुरु करे I

शुरु करने के लिये यहां क्लिक करें :

https://style4sure.com/referral/SRzE3IM5

केसांमुळे आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते. म्हणूनच आपल्या चेहऱ्याला साजेशी केसांची रचना केली जाते. आजच्या आधुनिक काळात स्री-पुरुषांनसाठी चेहरा आकर्षक दिसण्यासाठी व केसांची निगा राखण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. 

केस गळती ही समस्या तरुणपणातच अनेकांना भेडसावत असते. केस गळती होऊन टक्कल पडू नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात. केसांच्या आरोग्यासाठी अनेक उपाय करूनही केसगळती झाल्यामुळे अनेक स्री-पुरुषांना टक्कल पडते. त्यामुळे अनेकांना न्यूनगंड निर्माण होतो. मग या समस्येवर उपाय म्हणून अनेक मार्गाचा अवलंब केला जातो. त्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या तेलांचा समावेश असतो. केसांच्या स्वच्छतेसाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. आहाराचं नियोजन, विविध औषधांचा वापर केला जातो. एव्हडं करूनही काहीच निष्पन्न झाल नाही तर केस रोपण किंवा विग बसवणे असे अगदी आधुनिक पर्याय ही अनेकजण स्वीकारतात. 

केस गळतीची कारणे

अनेक स्री-पुरुष केस गळती या समस्येवर वेगवेगळे उपाय करत असतात. त्या सर्वच उपायांचे कमी अधिक लाभ ही काहीजणांना होत असतात. मुळात ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. केसगळतीच्या मुळाशी गेल्यास असे कळते की अनेक गोष्टींमुळे केसगळती ही समस्या उद्भवते. त्यात प्रामुख्याने आनुवंशिक कारणामुळे पिढी दर पिढी ही समस्या उद्भवत असते. काही विशिष्ठ औषधांच्या दुष्परिणामामुळे केस गळतात. काहींना ताणतणाव, आधुनिक पद्धतीची केसांची घातक केस रचना (हेअर स्टाईल), अयोग्य आहार, अयोग्य दिनचर्या, धूम्रपान, विशिष्ठ आजार, काही पेशंटना अनेक दिवस आंघोळ न केल्यामुळे, केसांमध्ये जास्त घाम येत असल्यास, किमो थेरपी सारख्या उपचारामुळे, केस धुण्यासाठी अयोग्य साधनांच्या वापरामुळे, केसांना तेल न लावणे, चुकीच्या पद्धतीने केसांना तेल लावणे, चुकीच्या पद्धतीचा हेड मसाज केल्यामुळे, खूप गरम पाण्याने केस धुतल्यामुळे, प्रदूषणामुळे, विशिष्ठ हवामानामुळे, चुकीचा कंगवा वापरल्यामुळे, काही महिलांना गरोदर असताना, प्रसूती नंतर, काही महिलांना रजोनिवृत्ति काळात हार्मोन्स बदल होत असल्यामुळे, डोक्यात होणारे त्वचा विकार, डोक्यात वरच्यावर कोंडा होत असेलतर, वरच्यावर केसांना आकार बदलण्यासाठी वापरले जाणारे हीटिंग आयर्न उपकरणामुळे, काहींना ठराविक ऋतूमध्ये केसगळती होते, एकाच प्रकारचा शॅम्पु अनेक महिने वापरल्यामुळे केसगळतीची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अजून एक मुख्य कारण म्हणजे ज्या पाण्यानी आपण केस धुतो त्या पाण्यातील जास्तीच्या टी डी एस (Total Dissolved Solids) मुळे केसगळती होत असते. 

वरील पैकी नेमक्या कोणत्या कारणांनी केसगळती होत आहे हे पटकन समजणे थोडे जिकरीचे असते. अश्या परिस्थितीत त्या व्यक्तीची दिनचर्या, कौटुंबिक माहिती, धूम्रपाना सारख्या सवयी अशी माहिती घेऊनही कधीकधी विशेष लॅब टेस्ट केल्यावर केसगळती समस्येचे कारण शोधण्यास मदत होते. 

Image Source : Google

आजच्या आधुनिक काळात केसगळतीवर अनेकविध औषध व शॅम्पु उपलब्ध आहेत. परंतु अनेक वेळा अनेक व्यक्ती स्वतःच्याच मनानी (जाहिराती बघून) औषध व शॅम्पु वापरत असतात. अनेकवेळा अश्या औषधान मधील व शॅम्पु मधील रसायन सर्वानाच लाभदायी होतील याची खात्री देता येत नाही. उलटपक्षी काहींच्या समस्या वाढतात. याचे कारण प्रत्येकाच्या केसांचा पोत, घनता, समस्ये मागील मूळ कारण, आरोग्य, दिनचर्या अश्या अनेक गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या असतात. केसां सारख्या व्यक्तिमत्व खुलवणाऱ्या महत्वाच्या घटकाला नैसर्गिक पोषण व उपचार मिळाल्यास तसेच डोळसपणे वेळच्या वेळी उपाय योजना केल्यास केसगळतीच्या समस्येवर आपण मात करू शकू. 

उपाय

शक्यतो नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्याचे जास्त फायदे असतात. मुख्य म्हणजे नैसर्गिक घटकांचे दुष्परिणाम काहीही नसतात. (अपवादात्मक एखाद्याला एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असू शकते.) नैसर्गिक घटक वापरून केलेली उपाय योजना प्रत्यक्षात समस्या दूर करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो; परंतु मूळ समस्येचा कायम स्वरूपी बंदोबस्त केला जातो असे अनुभवास येते. 

साहित्य : शिकेकाई, रिठा, कोरफड, तुरटी, आवळा, भीमसेनी कापूर, निम तेल, तुळस तेल, जोजोबा तेल, खोबरेल तेल.

गुणधर्म : ह्या घरगुती उपायात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया.

शिकेकाई : शिकेकाई ह्या वनस्पतीची शेंग नैसर्गिक शॅम्पु आहे. केसांची वाढ करणे, निरोगी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त, कोंडा होत नाही, केस गळती प्रतिबंधक, केसांना चमक आणण्यासाठी उपयुक्त, केसांचा काळा रंग टिकवून ठेवण्यासाठी. शिकेकाई अँटिऑक्सिडंट असून त्यात ए, सी, के व डी ही जिनसत्वे असतात. अनेक पिढ्यान पासून केस धुण्यासाठी याचा वापर होत आहे. 

Image Source : Google

रिठा : केसात होणाऱ्या कोंड्यामुळे केसगळतीला आळा घालण्यासाठी उत्तम. केसांच्या वाढीसाठी व वाढ खुंटलेल्या केसांची वाढ करण्यासाठी रिठा उपयोगी आहे.

कोरफड : कोरफड मध्ये व्हिट्यामिन सी व ई भरपूर प्रमाणात असते. त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम. कोरफड या वनस्पतीत केस हायड्रेटेड व मॉइश्चराइज्ड ठेवण्यासाठी चांगले गुणधर्म आहे. त्वचेवर येणारी खाज कोरफडीच्या वापराने जाते.  

Image Source : Google

तुरटी : तुरटीमध्ये पोट्याशियम एल्युमिनियम सल्फेट असते. अँटिसेप्टिक व अँटीबॅक्टेरियल तत्व असल्यामुळे त्वचा विकारावर उत्तम आहे. तुरटी ही पाण्यातील टी डी एस (Total Dissolved Solids) कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तुरटीमुळे केस दाट होतात. 

आवळा : आवळा या फळात व्हिट्यामिन सी, खनिजे व ऍमिनो ऍसीड भरपूर प्रमाणात असतात. आवळा अँटिऑक्सिडेन्ट असून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त. आवळा फळाच्या वापरामुळे केसांची गळती, तुटके केस, कोंडा, अकाली केस पिकण्यावर नियंत्रित करतो. केसांना पोषण मिळते.  

Image Source : Google

भीमसेनी कापूर : कापूर हा ज्वलनशील परंतु थंड पदार्थ आहे. केसांची मुळे मजबूत करण्यासाठी, केसांची वाढ करण्यासाठी, डोक्यातील कोंडा किंवा घामामुळे येणारी खाज घालवण्यासाठी कापूर उत्तम. उवा व लिखानचा नायनाट करण्यासाठी कापूर चांगला.  

निम तेल : या तेलात केसांचे पुनरुत्पादन करण्याची गुणवत्ता आहे. केसांच्या वाढीसाठी चांगले आहे. तणावग्रस्त मानसिक अवस्थेमुळे, प्रदूषणामुळे किंवा औषधांच्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या केसगळतीला रोखण्यासाठी सक्षम आहे. 

तुळस तेल : तुलसी तेलात अँटिऑक्सिडंट व अँटीबॅक्टेरियल तत्व असतात. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुळस खूपच उपयुक्त आहे. तुळस रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत ठेवते. कोरडी त्वचा, कोंडा व कंड दूर करण्यासाठी तुलसीचा उपयोग होतो. 

Image Source : Google

जोजोबा तेल : जोजोबा तेलामध्ये व्हिट्यामिन सी, बी व ई खूप प्रमाणात असते. तांबे, जस्त यासह केसांना पोषण देणारी काही खनिजं व जीवनसत्व असतात, केसगळती प्रतिबंधक म्हणून या तेलाचा वापर केला जातो. ह्या तेलाच्या वापराने केस दाट व मजबूत होतात. कोंडा प्रतिबंधक, कोरडे केस, तुटके केस व केसांना फाटे फुटत असल्यास (द्विमुखी केस) यावर गुणकारी. उत्तम मॉइश्चराइझर.

खोबरेल तेल : खोबरेल तेल हे केसांसाठी उत्तम मॉइश्चरायझर आहे. केस मऊ व चमकदार करण्यासाठी उपयुक्त. तुटके केस व केसांना फाटे फुटत असल्यास (द्विमुखी केस) यावर गुणकारी. या तेलामुळे केसांना प्रोटीन मिळते.

केस धुण्यापूर्वी कृती 

पुढील तेलांपैकी तुमच्यासाठीच योग्य तेल निवडून केस धुवायच्या आधी २० ते २५ मिनिटं आपल्या केसांच्या मुळांना लावावे.

१)   खोबरेल तेल + भीमसेनी कापूर (एक चिमूट पावडर)

२)   खोबरेल तेल किंवा कोरफड गर (ताजा) +  निम तेल (३-४ थेंब)

३)   खोबरेल तेल किंवा कोरफड गर (ताजा) +  तुळस तेल (३-४ थेंब)

४)   खोबरेल तेल किंवा कोरफड गर (ताजा) +  जोजोबा तेल (३-४ थेंब)

ज्यांना खोबरेल तेल चालत नसेल त्यांनी त्यांना चालणारे कोणतेही तेल वापरावे. (आयुर्वेदिक तेल, ऑलिव्ह तेल, राई तेल, बदाम तेल) 

ज्यांना केस गळती, कोंडा, अतिरिक्त घाम, डोक्यात होणाऱ्या उवा अश्या विविध किंवा एकतरी समस्या असतील  त्यांनी वरील उपाय समस्या पूर्णपणे जाई पर्यंत आठवड्यातून ३ वेळा म्हणजेच दर २ दिवसानंतर करावा. समस्या जशी जशी कमी होईल त्या प्रमाणे आठवड्यातून २ वेळा व १ वेळा गरजे नुसार कमी करावा.  (वर दिलेल्या औषधी गुणधर्मा नुसार व समस्ये नुसार वरील पैकी पर्याय निवडावा.). केसां बद्दल कोणतीही समस्या होऊ नये यासाठी पंधरा दिवसातून एकदा वरील सर्व पर्याय आलटून पालटून केले तरी चालेल.

नैसर्गिक शॅम्पू बनवण्याची कृती

सर्व प्रथम एका छोट्या भांड्यात एक कप पाणी घ्यावे. त्यात एक चमचा शिकेकाई पावडर, पाव चमचा रिठा पावडर, पाव चमचा आवळा पावडर टाकून पाणी उकळून घ्यावे. साधारण घट्ट द्रावण तयार झाल्यावर ते द्रावण कोमट होऊ द्यावे. हे तयार झालेले द्रावण केस थोडे ओले करून केसांच्या मुळांना लावावे ४-५ मिनिटांनी केस धुऊन टाकावेत. (आपापल्या केसांना पुरेल इतक्या प्रमाणात द्रावण तयार करताना वरील पदार्थामध्ये त्या त्या प्रमाणात बदल करावा.) वरील द्रावण २-४ दिवस टिकते परंतु शक्यतो ताजे बनवून वापरावे. 

केस धुण्यासाठीचे पाणी 

विहीर, बोअरवेल, नदी, धरणात साठवलेले नळातून येणारे असे आपल्या दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी आपल्याला याच माध्यमातून मिळते. साधे नळाचे पाणी किंवा कोमट पाण्यानी केस धुणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. नळातून आपल्या घरात येणाऱ्या पाण्यात जंतुनाशके असतात. हे सर्व पाणी आपल्या पर्यंत पोचण्याआधी खडक व मातीच्या संपर्कात येते त्यामुळे पाण्यात क्षार, मेटल, मिनरल्स, लोह असे विविध घटक कमी-अधिक प्रमाणात आढळतात. याच घटकांचे एकत्रित अतिरिक्त प्रमाण मानवी शरीरासाठी हानिकारक असते. त्याच पाण्यातील सर्व घटकांनाच टी डी एस (Total Dissolved Solids) असे म्हणतात. पाण्यातील जास्तीचा टी डी एस कमी करण्यासाठी केस धुवायच्या पाण्यात तुरटी फिरवावी. साधारणपणे ८-१० वळसे घ्यावेत. व ते पाणी निवळू द्यावे. साधारणपणे ५-१० मिनिटात पाणी निवळते. नंतर अलगद वरचे निवळलेले पाणी दुसऱ्या पात्रात काढून घ्यावे. गाळयुक्त उरलेले पाणी टाकून द्यावे. नंतर निवळलेल्या पाण्याने केस धुवावेत. तुरटी आपल्या त्वचेसाठी लाभकारी आहे. 

केसांचा कंडिशनर  

केस धुवून झाल्यावर केस दमट ओले असताना खोबरेल तेलाचे ३-४ थेंब हातावर चोळून केसांना लावावे. काहींना खोबरेल तेल चालत नसल्यास त्यांनी ऑलिव्ह तेल, बदाम तेल, आयुर्वेदिक तेल वापरावे. कोरफड जेल (ताजी) अगदी कमी प्रमाणात आधी दोन्ही हातानी चोळून घ्यावी व नंतर केसांना लावावी. केस विचारण्यासाठी / भांग पाडण्यासाठी लाकडी रुंद दातांचा कांगावा वापरावा. 

केसगळती या समस्येवर बाजारात अनेक उत्पादन उपलब्ध आहेत परंतु त्याचा वापर करण्या पूर्वी तज्ञ्यानचा सल्ला जरूर घ्या. 

वरील उपचार व्यक्ती, प्रकृती व ऋतुमाना नुसार कमी अधिक फायदेशीर होऊ शकतो. ह्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत तरी खबरदारी म्हणून ज्या व्यक्तींना वर वापरलेल्या औषधींचा काही विशेष त्रास असेल त्यांनी तज्ञानचा सल्ला घ्यावा.

वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.