13 Benefits of Padabhyanga
आयुर्वेदाने दिलेले पादाभ्यंगचे अनेक फायदे आहेत. जसे झाडाच्या मुळांना पाणी मिळाले की पूर्ण झाडाला त्याचा फायदा मिळतो. तसेच आपल्या तळ पायाला पादाभ्यंग केल्यास संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो. आपण रोज अंघोळ करून बाहेरून स्वच्छ होतो. तसेच रोज पादाभ्यंग करून आपण आतून स्वच्छ होतो. आपल्या शरीरातील उष्णता, वात, पित्त नियंत्रित राहतात. शरीरातील विषद्रव्य (Toxins) कमी होण्यास मदत होते.
पादाभ्यंग नित्यनियमित केल्यास बरेच फायदे मिळतात. तळपायाला तेल किंवा तूप लावून कांस्य वाटीने घासून मसाज करण्याच्या प्रकियेला पादाभ्यंग असे म्हणतात. आपल्या आजी-आजोबांनी वापरलेली कांस्य वाटी किंवा तळपायाला तेल किंवा तूप लावून कांस्य वाटीने घासताना आपण पाहिजे / अनुभवले असेलच. पादाभ्यंग करताना कांस्य वाटी कशी चकचकीत व्हायची ते आपल्या पैकी काही जणांनी पाहिले असेलच; याच पादाभ्यंगाचे अनेक फायदे आहेत. ही प्रक्रिया हातानी व मशीन च्या माध्यमातूनही करता येते.

पादाभ्यंगचे फायदे
➧ शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते
➧ शरीरातील वात संतुलित होतो
➧ शरीरातील थकवा जातो
➧ डोळ्यांची कार्यक्षमता वाढते
➧ झोप शांत लागते
➧ तळपायाच्या भेगा बऱ्या होतात
➧ पित्ताचा त्रास कमी होतो
➧ टाचदुखीवर उपयोगी
➧ पायाची सूज कमी होते
➧ चेहऱ्या वरील डाग कमी होतात
➧ पायाच्या तळव्यांची जळजळ कमी होते
➧ डोळ्या खालची काळी वर्तुळ कमी होतात
➧ व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
वरील फायदे वाचल्यावर तुमच्या लक्षात आल असेल की पादाभ्यंग रोज करण किती महत्वाच आहे. ज्या व्यक्ती झोप येत नाही म्हणून झोपेची औषधे घेतात त्यांनी पादाभ्यंग नियमित केल्यास झोपेचे औषध घ्यावे लागणार नाही. वरील सर्व फायदे अपेक्षित असल्यास सातत्य फार महत्वाचे आहे. त्या साठी रोज पादाभ्यंग करा.
तळपायाला जखमा झाल्या असतील किंवा काही कारणाने तळपायाला पादाभ्यंग करणे शक्य नसल्यास तळहातावर तिच प्रक्रिया करून चालते. पादाभ्यंग गरोदर स्त्री ने ही केला तरी चालतो. सर्व साधारण वयवर्ष १२ पासून पुढे कोणीही केले तरी चालत. पादाभ्यंग दिवसाच्या कोणत्याही वेळी केलेले चालते. अगदी जेवल्यावर केले तरी चालते. पादाभ्यंगाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
म्हणूनच आम्ही म्हणतो की तळपाय स्वस्थ तर आरोग्य मस्त. आपल्या शरीरातील सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे आपले तळपाय.
कृपया आपल्या तळपायाची काळजी घ्या.
डीप व्हेन थ्रोम्बोसिस व हत्ती पाय या व्याधी असलेल्या व्यक्तींनी तज्ञानचा सल्ला घेतल्या शिवाय करू नये. पायांच्या काही विशिष्ट आजारात तज्ञानचा सल्ला अवश्य घ्या.
वरील लेखा बद्दल आपला अभिप्राय जरूर द्या. वरील विषया संदर्भात काही अधिक माहिती हवी असल्यास किंवा विषयाला धरून एखाद्या नवीन मुद्या बद्दल माहिती हवी आल्यास आम्हाला जरूर कळवा; आम्ही लवकरात लवकर योग्य माहिती aarogyasakha.com वर प्रकाशित करू. आमची वेबसाईट पाहिल्या बद्दल आपले मनापासून आभार.
कास्यथाळी मसाज म्हणजे शरीराच्या दुर्लक्षित भागाची कार्य क्षमता वाढवणे व्याधी मुक्त शरीर ठेवणे